फॅशन स्टायलिस्ट नीलिमा सेठिया यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये को-ऑर्ड सेट नाईटसूटसारखा न दिसता फॅशन आउटफिटसारखा कसा घालायचा, याबाबत काही खास टिप्स दिल्या आहेत. या टिप्स फॉलो केल्यास तुमचा लूक लगेच अपग्रेड होऊ शकतो.
या गोष्टी तुमच्या को-ऑर्ड सेटला बनवतील स्टायलिश
टँक टॉप : को-ऑर्ड सेटच्या आत एक फिटेड टँक टॉप घालणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे कमरेचा भाग नीट डिफाइन होतो आणि आउटफिटला स्ट्रक्चर मिळतं. जेव्हा कपडे शेपमध्ये दिसतात, तेव्हा ते नाईटवेअरऐवजी ट्रेंडी फॅशन आउटफिट वाटतात.
advertisement
हिल्ससोबत पेअर करा : को-ऑर्ड सेट फ्लॅट्स किंवा चप्पलांसोबत घातल्यास तो जास्त कॅज्युअल आणि नाईटसूटसारखा दिसू शकतो. त्याऐवजी ब्लॉक हिल्स किंवा स्ट्रॅपी हिल्स निवडा. हिल्स पूर्ण लूकला वाढवतात. तुम्हाला स्मार्ट आणि कॉन्फिडंट अपिअरन्स देतात.
अॅक्सेसरीजने बदलेल संपूर्ण लूक : योग्य अॅक्सेसरीज को-ऑर्ड सेटचा संपूर्ण गेम बदलू शकतात. स्टेटमेंट इअररिंग्स, गोल्ड चेन नेकलेस किंवा ब्रेसलेट्स यामुळे आउटफिटला क्लासी टच मिळतो. त्यासोबत एक स्टायलिश हँडबॅग घेतली, तर तुमचा लूक आणखी आकर्षक दिसतो.
फॅब्रिक आणि फिटिंगकडे लक्ष द्या : नेहमी चांगल्या दर्जाचं फॅब्रिक असलेले को-ऑर्ड सेट निवडा. खूपच सैल किंवा ओव्हरसाइज सेट टाळा. कारण त्यामुळे आउटफिट नाईटवेअरसारखा दिसू शकतो. व्यवस्थित फिट होणारे कपडे नेहमीच अधिक एलिगंट वाटतात.
रंगांची योग्य निवड करा : न्यूट्रल किंवा सॉलिड रंगांचे को-ऑर्ड सेट जास्त प्रीमियम आणि स्टायलिश दिसतात. फार प्रिंटेड किंवा पायजामासारख्या डिझाइनचे सेट निवडल्यास ते नाईटवेअर वाटू शकतात.
थोडक्यात सांगायचं तर, योग्य फिटिंग, स्टायलिंग आणि अॅक्सेसरीज यांचा मेळ साधला, तर को-ऑर्ड सेट कधीच नाईटसूटसारखा दिसणार नाही. थोडे बदल करून तुम्ही त्यालाच एक परफेक्ट फॅशन आउटफिटमध्ये रूपांतरित करू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
