पॅनिक अटॅकची लक्षणे
तीव्र भीती आणि चिंता : पॅनिक अटॅकचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे कोणतीही स्पष्ट कारण नसताना अचानक तीव्र भीती वाटणे. ही भीती इतकी तीव्र असते की, व्यक्तीला आपले नियंत्रण सुटत आहे किंवा आपण वेडे होत आहोत असे वाटते.
शारीरिक लक्षणे : यात हृदयाचे ठोके अचानक वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, खूप घाम येणे, थरथरणे आणि डोके हलके वाटणे यांचा समावेश होतो. काहीवेळा व्यक्तीला असे वाटते की त्याला हृदयविकाराचा झटका येत आहे.
advertisement
शरीरावर नियंत्रण सुटल्यासारखे वाटणे : अनेकदा व्यक्तीला असे वाटते की त्याचे स्वतःच्या शरीरावर नियंत्रण राहिलेले नाही आणि तो बेशुद्ध होईल. हे लक्षण खूप त्रासदायक असू शकते.
पॅनिक अटॅकची कारणे
मानसिक तणाव: सततचा मानसिक ताण आणि चिंता पॅनिक अटॅकचे प्रमुख कारण आहे.
अनुवांशिक कारणे: काहीवेळा पॅनिक अटॅक अनुवांशिक असू शकतो. जर कुटुंबात कोणाला पॅनिक डिसऑर्डर (Panic Disorder) असेल, तर इतरांनाही तो होण्याचा धोका असतो.
बचावाचे उपाय
दीर्घ श्वास घेणे: जेव्हा पॅनिक अटॅक येतो, तेव्हा दीर्घ श्वास घेतल्याने हृदयाचे ठोके सामान्य होतात आणि मन शांत होते.
नियमित व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि ताण कमी होतो.
डॉक्टरांचा सल्ला: जर तुम्हाला वारंवार पॅनिक अटॅक येत असेल, तर त्वरित मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. योग्य औषधोपचार आणि थेरपीने यावर नियंत्रण मिळवता येते.
दारू आणि कॅफिनपासून दूर राहा: दारू आणि कॅफिन सारख्या पदार्थांमुळे पॅनिक अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांचे सेवन मर्यादित करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)