9 दिवसांच्या उपवासासाठी योग्य आहार
काय खावे?
उपवासादरम्यान फळे, दुध, दही, पनीर, ताक, साबुदाणा, शिंगाड्याचे पीठ, राजगीरा आणि रताळे खाऊ शकता. हे पदार्थ शरीराला आवश्यक ऊर्जा देतात.
काय खाऊ नये?
उपवासात गहू, तांदूळ, मैदा आणि डाळी खाणे टाळावे. तसेच, सामान्य मीठाऐवजी सैंधव मीठ वापरावे.
हायड्रेटेड राहा
उपवासादरम्यान शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी, नारळ पाणी, लिंबू सरबत आणि ताक प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि थकवा दूर होतो.
advertisement
कमी खा आणि वारंवार खा
एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, दिवसभर थोड्या थोड्या वेळाने खा. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि तुम्हाला भूक लवकर लागत नाही.
तळलेले पदार्थ टाळा
अनेकदा उपवासात साबुदाणा वडा, बटाटा चिप्स आणि पुरीसारखे तळलेले पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ पचनाला जड असतात आणि ॲसिडिटी वाढवू शकतात. त्याऐवजी भाजलेले शेंगदाणे, मखाना किंवा भाज्यांचा वापर करा.
पोषक तत्वांचा समतोल राखा
उपवासादरम्यान प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समतोल राखणे आवश्यक आहे. यासाठी दुग्धजन्य पदार्थ आणि भाज्या खाणे महत्त्वाचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)