Pune Metro: पुण्यात नवी क्रांती, मेट्रो 3 चा कंट्रोल 100 नवदुर्गांच्या हाती, नेमका निर्णय काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune Metro: पुण्यातील मेट्रो प्रशासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता मेट्रो 3 चा संपूर्ण कंट्रोल 100 महिलांच्या हाती असणार आहे.
पुणे: इतिहासात प्रथमच पुणे मेट्रो प्रशासनाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसऱ्या मार्गावरील सर्व मेट्रोगाड्या आता फक्त महिला चालवणार आहेत. याची माहिती सोमवारी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने दिली. महिलांच्या सबलीकरणाला नवे बळ देत मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पुणे शहरात महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शंभर महिलांना मेट्रो चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. आता या महिला संपूर्ण आत्मविश्वासाने मेट्रोचे चाक हाती घेण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिवस-रात्र सुरक्षित, वेळेवर आणि कुशल सेवांचा अनुभव मिळणार आहे.
महिला चालक मेट्रो चालवतील हा निर्णय केवळ रोजगार निर्मितीचा नाही, तर महिलांच्या सुरक्षिततेलाही नवी दिशा देणारा आहे. रात्री उशिरा होणाऱ्या प्रवासासाठीही आता महिलांना दिलासा मिळणार आहे. एकाच वेळी 200 किमीच्या प्रवासाचा ताण, तांत्रिक हाताळणी आणि शिस्तबद्ध ड्रायव्हिंग या साऱ्याचे मोठे आव्हान महिला सामर्थ्याने पूर्ण करणार आहेत.
advertisement
परंपरेने पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत महिलांनी पाऊल टाकणे हा मोठा टप्पा मानला जात आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांनी केवळ गाड्या चालविण्याचेच नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याचे कौशल्यही आत्मसात केले आहे. त्यामुळे प्रवाशांचा आत्मविश्वास दुपटीने वाढणार आहे.
असा असणार मेट्रो रूट
हिंजवडी ते शिवाजीनगर असा हा मेट्रो रूट असणार आहे. या मेट्रो रूटवर एकूण 23 स्थानके आहेत. मेगापोलीसी सर्कल, बिझनेस पार्क, इन्फोसिस फेज 1, विप्रो फेज 2, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, बाणेर, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, आरबीआय, ॲग्रीकल्चर कॉलेज, शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय.
advertisement
महिलांना तांत्रिक क्षेत्रात संधी मिळेल
शंभर महिलांद्वारे मेट्रो चालवण्याचा पुणे मेट्रोचा हा निर्णय फक्त वाहतूक समस्येवर पर्याय नसून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. महिलांना तांत्रिक क्षेत्रात मोठ्या संधी यामुळे उपलब्ध होणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 23, 2025 8:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: पुण्यात नवी क्रांती, मेट्रो 3 चा कंट्रोल 100 नवदुर्गांच्या हाती, नेमका निर्णय काय?