Weather Alert: मराठवाड्यात आभाळ फाटलं! मंगळवारी पुन्हा धो धो कोसळणार, 7 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असून आज 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. विशेषत: मराठवाड्यात आभाळ फाटल्याचं चित्र असून अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत आहे. अशातच 23 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
हवामान विभागाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या 7 जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे याकाळात साधारणतः वातावरण ढगाळ राहणार असून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाट मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत असू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात रस्त्यावर पाणी साचलं. तर काही ठिकाणी दुकानांमध्ये आणि घरांमध्येही पाणी घुसले, या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडवली. धाराशिवमध्ये देखील पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुका हा दर वर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आता पाऊस नको रे बाबा’ असं म्हणायला लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. खरीप हंगामाची पीक पाण्याखाली गेली आहे. तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे हातात आलेले कापसाचे पीक पावसामुळे उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
advertisement
मराठवाड्यातील नांदेड वगळता 7 जिल्ह्यांना आज सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अचानक अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांना सावध राहावे लागेल. नद्यांची पाणीपातळी वाढत असल्याने नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणे जाणे गरजेचे आहे. तसेच हवामान अंदाज आणि सरकारी सूचना लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करण्याची गरज आहे.