Pune Crime : पुण्यात 'देवा'साठी सासूने सुनेला कोर्टात खेचलं, घटस्थापनेआधी मिळाला न्याय!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime News : पुण्यात सासू आणि सुनेच्या लढाईत सासूने घट बसवण्यासाठी सुनेला कोर्टात खेचलं आहे. नेमका वाद काय? जाणून घ्या
Pune Court Story : प्रत्येक घरात सासू आणि सुनेचा वाद होतच असतो. त्याला काही औषध नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण पुण्यात धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. पुण्यातील एका सासूने घटस्थापनेच्या मुर्तीसाठी सुनेला कोर्टात खेचलं अन् न्याय मिळवला आहे. पुण्यातील एका कौटुंबिक वादामध्ये कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर घरातील परंपरागत देवाच्या मूर्ती आणि टाक सुनेच्या ताब्यातून सासूला पूजेसाठी परत देण्याचा आदेश लष्कर कोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता सासूला घटस्थापना करणे शक्य होणार आहे.
कायद्यानुसार कोर्टात दाद मागितली
सासूचा आरोप आहे की, सुनेने भांडणातून पती आणि तिला घरातून बाहेर काढले आहे आणि त्यांच्या मालकीचा बंगला स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात सासूने घरगुती हिंसाचार कायद्यानुसार कोर्टात दाद मागितली आहे. हा खटला सुरू असतानाच, घटस्थापना जवळ आल्यामुळे सासूने कोर्टात एक अर्ज दाखल केला. अनेक वर्षांपासून तीच कुटुंबाच्या कुलदेवतांची पूजा करत आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या पूजेसाठी तिला मूर्ती आणि टाक मिळावेत अशी मागणी तिने केली.
advertisement
मूर्ती आणि टाकांची पूजा
सासूच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, त्या गेली 40 वर्षे या मूर्ती आणि टाकांची पूजा करत आहेत. हा त्यांचा परंपरागत हक्क आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. एस. कवडे यांनी सासूचा अर्ज मंजूर केला. कोर्टाने सुनेला तात्पुरत्या स्वरूपात देवाच्या मूर्ती आणि टाक सासूला देण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय, कोर्टाने दोन्ही पक्षांना सासू आणि तिच्या पतीचे कपडे तसेच इतर सामान कसे परत करायचे, यावर एक योजना तयार करून कोर्टात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
advertisement
सासूचा अर्ज मंजूर केला
दरम्यान, सुनेने पती व सासूला त्रास देऊन बंगल्याबाहेर काढले. मात्र, सासू मागील चाळीस वर्षांपासून घटस्थापना करीत असून, पूजा करीत आहेत. यंदाही त्यांना घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर देवाचे टाक आणि मूर्तीची पूजा करायची आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सासूचा अर्ज मंजूर केला, असं सासूच्या वकीलने सांगितलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 22, 2025 11:14 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात 'देवा'साठी सासूने सुनेला कोर्टात खेचलं, घटस्थापनेआधी मिळाला न्याय!