Richest TV Actress : बनायचं होतं IAS, पण झाली हिरोईन; TV गाजवणाऱ्या अभिनेत्रीने जमवली इतकी संपत्ती, 6 पिढ्या बसून खातील
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Richest TV Actress : एका अभिनेत्याने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे की, या अभिनेत्रीने इतकी संपत्ती कमावली आहे की, ती तिच्या सहा पिढ्यांनाही पुरेल!
advertisement
आज तिने केवळ अभिनयातच नाही, तर संपत्तीच्या बाबतीतही एक मोठे साम्राज्य उभे केले आहे. तिच्या एका सहकलाकाराने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे की, या अभिनेत्रीने इतकी संपत्ती कमावली आहे की, ती तिच्या सहा पिढ्यांनाही पुरेल! ५२ वर्षीय ही लोकप्रिय स्टार आजही आपल्या मोहक अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करते.
advertisement
advertisement
१९७३ मध्ये राजस्थानमध्ये जन्मलेल्या साक्षी तन्वरचे वडील निवृत्त CBI अधिकारी होते. साक्षी स्वतः एक हुशार विद्यार्थिनी होती आणि वडिलांप्रमाणे सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचे तिचे स्वप्न होते. १९९८ मध्ये एका मित्राच्या विनंतीवरून ती दूरदर्शनच्या एका कार्यक्रमाच्या ऑडिशनला गेली आणि तिच्या आयुष्याचा प्रवास बदलला.
advertisement
तिने सुरुवातीला टीव्ही प्रेझेंटर म्हणून काम केले. पण 'कहानी घर घर की' मालिकेत 'पार्वती'ची भूमिका साकारून ती देशभरातील कुटुंबांची लाडकी सून बनली. ही मालिका आठ वर्षे यशस्वीपणे चालली. तिचा अभिनय छोट्या पडद्यापुरता मर्यादित राहिला नाही. आमिर खानच्या 'दंगल' या ब्लॉकबस्टर चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिला सिनेविश्वात मोठी ओळख मिळाली.
advertisement
advertisement


