गुन्हेगारांना शोधणारा 'कुंचला', पोलीस दलात नसूनही आतापर्यंत केलं महत्त्वाचं काम

Last Updated:

पुण्यातील गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले डॉ. गिरीश चरवड गेल्या 30 वर्षांपासून पोलिसांना आरोपींची रेखाचित्रं विनामूल्य काढून देत आहेत.

+
पेन्सिलच्या

पेन्सिलच्या मदतीने गुन्हेगारांना पकडून देणारा अवलिया 

पुणे: पुण्यातील गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले डॉ. गिरीश चरवड गेल्या 30 वर्षांपासून पोलिसांना आरोपींची रेखाचित्रं विनामूल्य काढून देत आहेत. भारती विद्यापीठ, कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समधील असोसिएट प्रोफेसर असलेल्या डॉ. चरवड यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांची महत्त्वाची मदत केली आहे. त्यांच्या सेवेमुळे अनेक बलात्कार पीडित महिलांना न्याय मिळाला आहे. अलीकडेच बोपदेव परिसरात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचं रेखाचित्र त्यांनीच काढलं, ज्यामुळे पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश मिळालं. त्यांच्या या सगळ्या कार्याबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
30 वर्षांपासून विनामूल्य सेवा
डॉ. गिरीश चरवड यांनी सांगितलं की, 1994 साली झालेल्या प्रसिद्ध राठी हत्याकांड प्रकरणात त्यांनी पहिल्यांदा प्रत्यक्षदर्शीच्या वर्णनावरून गुन्हेगाराचं रेखाचित्र काढलं. हे रेखाचित्र पोलिसांच्या तपासासाठी खूप उपयोगी ठरलं. तेव्हापासून आजवर त्यांनी राज्यभरातील अनेक चर्चेत असलेल्या प्रकरणांमध्ये खून, अपहरण, बॉम्बस्फोट, दरोडे, साखळीचोरी, खंडणी आणि बलात्कार अशा गुन्ह्यांतील संशयितांची रेखाचित्रं काढली.
advertisement
त्यांच्या या रेखाचित्रांमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले. अनेक वेळा प्रत्यक्ष आरोपी आणि त्यांच्या रेखाचित्रातील साम्य 90 ते 100 टक्क्यांपर्यंत आढळून आलं आहे. आतापर्यंत त्यांनी 700 हून अधिक गुन्हेगारांचे रेखाचित्र तयार केले आहेत, जे अनेक प्रकरणांमध्ये तपासासाठी उपयुक्त ठरले आहेत.
advertisement
डॉ. गिरीश चरवड यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की, सरकारने शिक्षण व्यवस्थेत फॉरेन्सिक स्केच आर्टिस्ट्रीचा विशिष्ट आणि सखोल अभ्यासक्रम लागू करावा. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना या क्षेत्रात प्रशिक्षण मिळावं. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संशोधन आणि विकास प्रयोगशाळा असाव्यात.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
गुन्हेगारांना शोधणारा 'कुंचला', पोलीस दलात नसूनही आतापर्यंत केलं महत्त्वाचं काम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement