फक्त 1000 रुपयांमध्ये रेल्वे स्थानकावर सुरू करा व्यवसाय, असा घ्या खास योजनेचा लाभ, Video

Last Updated:

राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर या योजनेअंतर्गत विविध वस्तूंचे स्टॉल्स आता पाहायला मिळतात.

+
News18

News18

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांना स्थानिक उत्पादने सहज उपलब्ध करून देण्यासाठी आणि लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक स्थानक एक उत्पादन (One Station One Product)’ ही योजना सुरू केली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर या योजनेअंतर्गत विविध वस्तूंचे स्टॉल्स आता पाहायला मिळतात.
या उपक्रमामुळे हस्तकला उद्योजकांना आणि महिला स्वयंरोजगार गटांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी मिळत आहे. जर तुम्हीदेखील हाताने बनवलेल्या वस्तू (हँडमेड आयटम्स) तयार करत असाल, तर अगदी कमी खर्चात रेल्वे स्थानकावर तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
advertisement
काय आहे ‘एक स्थानक एक उत्पादन’ योजना?
या योजनेत प्रत्येक स्थानकावर त्या परिसरातील स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिलं जातं. उदाहरणार्थ – काही ठिकाणी वारली चित्रकला, तर काही ठिकाणी हस्तनिर्मित बांगड्या, पर्स, ज्यूट बॅग्स, खाद्यपदार्थ, हँडिक्राफ्ट वस्तू अशा अनेक वस्तू विक्रीसाठी लावल्या जातात.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
हस्तकला उद्योजक, लघुउद्योग करणारे व्यापारी, स्वयंरोजगार गट, महिला बचत गट, ग्रामोद्योग किंवा खादी उत्पादक
advertisement
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे ‘आर्टिझन कार्ड’ (Artisan Card) असणे आवश्यक आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी पूर्ण प्रक्रिया ऑफलाइन आहे.
हे कार्ड मिळवण्यासाठी बेलापूर येथील CGO (Central Government Office) मध्ये जावे लागते.
तिथे तुम्ही तयार केलेल्या वस्तूंचा डेमो (प्रात्यक्षिक) द्यावा लागतो.
अधिकाऱ्यांकडून त्या वस्तूंचा व्हिडिओ शूट केला जातो आणि तुमची माहिती फॉर्ममध्ये भरली जाते.
advertisement
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे कार्ड तुम्हाला 1 ते 2 महिन्यांत पोस्टाने घरी मिळते.
आवश्यक इतर कागदपत्रे
आर्टिझन कार्ड किंवा खादी ग्रामोद्योग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, गुमास्ता लायसन्स, भाडे आणि खर्च या स्टॉलसाठी तुम्हाला फक्त 1000 रुपये भरावे लागतात, जे 15 दिवसांचे भाडे असते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
फक्त 1000 रुपयांमध्ये रेल्वे स्थानकावर सुरू करा व्यवसाय, असा घ्या खास योजनेचा लाभ, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement