शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज, CCI मार्फत हमीभावाने कापसाची खरेदी सुरू, जालन्यात काय मिळाला भाव?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सीसीआयमार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पाहुयात या सीसीआय केंद्रावर कशा पद्धतीने कापसाची खरेदी केली जात आहे.
जालना: सीसीआय मार्फत कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर येथे पहिले केंद्र सुरू करण्यात आले. 11 नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील सीसीआयमार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पाहुयात या सीसीआय केंद्रावर कशा पद्धतीने कापसाची खरेदी केली जात आहे.
केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाला 8110 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. यानुसारच बदनापूर येथे सर्वात कमी आर्द्रता असलेल्या आठ मॉइश्चरच्या कापसाला 8150 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर दिला जात आहे. तर आर्द्रता वाढल्यास दरामध्ये कपात केली जात आहे. जालना जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे हेक्टरी 12 क्विंटल कापूस सीसीआय मार्फत स्वीकारला जात आहे. ही मर्यादा अत्यंत तोकडी असल्याने ती वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
advertisement
सीसीआय मार्फत कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत कपास किसान या सीसीआयच्या ॲपमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. यानुसार असंख्य शेतकऱ्यांनी या ॲपमध्ये नोंदणी केली आहे. ॲपमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सीसीआय मार्फत कापूस विकता येणार आहे.
advertisement
पावसामुळे कापसाची गुणवत्ता खालावली असली तरी शेतकऱ्यांनी जास्त आर्द्रता असलेला कापूस वाळवून विक्रीस आणावा. तसेच बाजार समितीकडून संमती मिळाल्यानंतरच दिलेल्या स्लॉटनुसारच कापसाची गाडी सीसीआय केंद्रावर आणावी, असं आवाहन बदनापूर येथील सीसीआय अधिकारी महेंद्र पटेल यांनी लोकल 18 शी बोलतांना केलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Nov 13, 2025 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज, CCI मार्फत हमीभावाने कापसाची खरेदी सुरू, जालन्यात काय मिळाला भाव?







