advertisement

Suryakumar Yadav : 69 नंबरची 'लकी कॅप', सूर्या T20 वर्ल्ड कपमध्येही घालणार, टोपीमागे दडलंय काय?

Last Updated:

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 46 रननी दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत भारताने 5 टी-20 मॅचची ही सीरिज 4-1 ने जिंकली आहे.

69 नंबरची 'लकी कॅप', सूर्या T20 वर्ल्ड कपमध्येही घालणार, टोपीमागे दडलंय काय?
69 नंबरची 'लकी कॅप', सूर्या T20 वर्ल्ड कपमध्येही घालणार, टोपीमागे दडलंय काय?
तिरुवनंतपूरम : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 46 रननी दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत भारताने 5 टी-20 मॅचची ही सीरिज 4-1 ने जिंकली आहे. टी-20 वर्ल्ड कपआधीचा भारताची ही शेवटची सीरिज होती, त्यामुळे हा विजय वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढवणारा नक्कीच असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये विजय मिळवण्यासोबतच टीम इंडियाने नवा वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे.
5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने एकूण 69 सिक्स मारल्या. एखाद्या टी-20 सीरिजमध्ये एवढ्या सिक्स मारण्याचा हा विश्वविक्रम आहे. याआधी इंग्लंडने एका सीरिजमध्ये 64 सिक्स मारल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने तब्बल 23 सिक्स ठोकल्या. एका टी-20 मॅचच्या इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरीही भारताने केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव हा बोलण्यासाठी आला तेव्हा त्याला त्याच्या टोपीवर असलेल्या 69 नंबरबद्दल विचारण्यात आलं. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 69 सिक्स मारून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, त्यामुळे तू 69 नंबरची टोपी घालून आला आहेस का? असा प्रश्न सूर्यकुमार यादवला विचारला गेला, तेव्हा सूर्याने 'मला या वर्ल्ड रेकॉर्डबद्दल माहिती नव्हतं, 69 नंबरची ही कॅप कुलदीप यादवची आहे, पण टी-20 वर्ल्ड कपमध्येही मी हीच कॅप घालून खेळेन', असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.
advertisement
7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पहिल्याच दिवशी युएसएविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडेल. यानंतर 12 फेब्रुवारीला भारतीय टीम नामिबियाविरुद्ध दिल्लीमध्ये, 15 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि 18 फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : 69 नंबरची 'लकी कॅप', सूर्या T20 वर्ल्ड कपमध्येही घालणार, टोपीमागे दडलंय काय?
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement