Vasai Virar News : नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO ही समोर, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
Vasai Virar News : विजय देसाई, प्रतिनिधी वसई-विरार : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दीपक परब असे त्यांचे नाव आहे. या घटनेत त्यांच्या पत्नीलाही मारहाण झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठी एकीकरण समिती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकांनी पोलिसांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी संबंधितांवर कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील आचोळे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रश्मी स्टार सिटी सोसायटीत ही घटना घडली आहे. या सोसायटीत दीपक परब हे आपल्या पत्नीसमवेत वास्तव्यास आहेत.त्यांच्या वरच्या मजल्यावरील सदनिकेत फरशी व ग्रील बसवण्याचे काम सुरू होते.या कामास सोसायटीकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र तरीही संबंधित सदनिकाधारक सिंग यांनी मध्यस्थी करण्यासाठी दीपक परब यांना सोसायटी कार्यालयात बोलण्यास सांगितले.यावेळी सोसायटी पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला, मात्र तो वाद त्या रात्री मिटल्याचे समजले जात होते.
advertisement
मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २६ जानेवारी २०२६ रोजी दीपक परब यांना पुन्हा सोसायटी कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे आधीच ठरविल्याप्रमाणे 10 ते 15 जणांच्या जमावाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला असा आरोप दिपक परब यांनी केला आहे. तसेच या हल्ल्यात दीपक परब यांना जबर मारहाण करण्यात आली असून, त्यांच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली होती.
advertisement
यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी एकीकरण समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकांनी पोलिसांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक न केल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 11:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar News : नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO ही समोर, नेमकं काय घडलं?








