तुरीवर अळीचा प्रादुर्भाव? असं करा रोग व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांच्या महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
तुरीचे पीक सध्या फ्लोरा अवस्थेत असून या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव तूर पिकावर वाढत असतो.
सोलापूर : तुरीचे पीक सध्या फ्लोरा अवस्थेत असून या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव तूर पिकावर वाढत असतो. तुरीवर किडीचा प्रादुर्भाव कसा रोखायचा? तुरीवरील प्रमुख रोग कोणते? तुरीवरील प्रमुख किडी कोणती? रोगापासून आणि किडीपासून तूर पिकाचे कसे संरक्षण करावे? या संदर्भात अधिक माहिती मोहोळ येथील कृषी विज्ञान तज्ज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी कडधान्यातील तूर हे महत्त्वाचे पीक आहे. तुरीच्या पिकावर जवळपास 200 पेक्षा अधिक किडी आढळतात, तर तुरीच्या पिकावर 5 ते 6 प्रकारच्या वेगवेगळे रोग आढळतात. तुरीच्या पिकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणारे अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी अशा वेगवेगळ्या प्रकारचे अळी या तुरीच्या पिकावर आढळतात. तुरीच्या पिकावर शेंगा लागायला सुरुवात झाली की त्यावर शेंगा पोखरणारे अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. शेंगा पोखरणारी अळी ही अत्यंत बहुभक्षी अळी मानली जाते. ही अळी तूर पिकावर आपली उपजीविका न करता वेगवेगळ्या पिकांवर सुद्धा आपली उपजीविका करत असते.
advertisement
शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन
view commentsतुरीचे पीक फ्लोरा अवस्थेत असताना शेंगा पोखरणाऱ्या अळी अंडी देतात. अंड्यातून अळी बाहेर येतात तेव्हा कोवळ्या पानांवर, फुलांवर, अंडी घालत असतात. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करायचा असेल तर एकरी चार ते पाच कामगंध सापळे लावणे, इंग्रजीत टी आकाराचे 30 ते 50 पक्षी थांबे लावणे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्काची फवारणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करावी. अशा पद्धतीने शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून तुरीच्या पिकाचे संरक्षण केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळेल, असा सल्ला कृषी विज्ञान तज्ज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी दिला.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
November 13, 2025 4:06 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव? असं करा रोग व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांच्या महत्त्वाचा सल्ला

