Pune Navale Bridge Accident: नवले पुलावर 22 गाड्यांचा चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू, अपघात नेमका कसा झाला? पोलिसांनी संगळं सांगितलं

Last Updated:

पुण्यातील नवले पुलावर संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली.

News18
News18
पुणे:  पुणे शहरात मृत्यूचा पूल म्हणून ओळखला जाणाऱ्या नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कंटेनरचं ब्रेक फेल झालं. ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनरनं समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. जवळपास २० ते २५ वाहनांना धडक दिली. या अपघातात ७ ते ८ जणांचा मृत्यू झाला आहे, या अपघातात कंटेनर चालकाचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलावर संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. जवळपास २ किलोमीटर हा कंटेनर समोर येईल त्या वाहनांना धडक देत पुढे जात होता.  20 एक गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातात कारला आग लागली आहे. क्रेन लावून कंटेनर आणि ट्रक बाजूला केले जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. जी कार मध्ये अडकली होती तिला आग लागली होती, तिला विझवण्यात आलं आहे. कारमध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांची ओळख पटवली जात आहे. या अपघातात ६ ते ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
 अपघात नेमका झाला कसा? 
राजस्थान पासिंगचा जो भरलेला ट्रक होता. तो साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईकडे जात होता. परंतु, या ठिकाणी येत असताना नवले ब्रिजवर सेल्फी पॉईंट आहे, त्या ठिकाणी ब्रेक फेल झालं. त्यानंतर समोर येईल, ज्या गाड्यांना धडक देत होता. यामध्ये जवळपास २० ते २२ गाड्यांना धडक देत तो पुढे आला. त्यानंतर एका मोठ्या ट्रकला मागून धडकला. यावेळी दोन्ही गाड्यांमध्ये कार सापडली. त्या कारचा सँडविच झाला. ही कार CNG कार होती, कारमध्ये जे लोक अडकले त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
advertisement
कंटेनरचालकाचाही मृत्यू
१५ ते २० वाहनांना धडक दिली आहे. त्याची पाहणी केली जात आहे. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. हा घातपात तर नाही ना, याचा शोध घेतला जात आहे. या अपघातात ७ ते ८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल दाखल आहे. या अपघातात कंटेनरचा चालकाचाही मृत्यू झाला आहे. जे लोक कात्रजकडून मुंबईच्या दिशेनं जात आहे, त्यांनी एक तास तरी प्रवास करू नये. वाहतूक सुरळीत करण्यासाठी १ तासांचा वेळ लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Navale Bridge Accident: नवले पुलावर 22 गाड्यांचा चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू, अपघात नेमका कसा झाला? पोलिसांनी संगळं सांगितलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement