Pune News : ‘विश्वास 2025’ प्रकल्पाचा कचरा वेचकांना फटका, रोजगार आला धोक्यात, कामगारांचे नेमके म्हणणे काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
या प्रकल्पाचा फटका तिथे काम करणाऱ्या कचरा वेचकांना बसत आहे. पगार वेळेवर मिळत नाही, असा आरोप कचरा वेचक कामगारांनी केला आहे
पुणे : पुणे महानगरपालिकेने विमाननगर परिसरात PMC Vishwas 2025 हा यांत्रिकीकरणाचा प्रयोग सुरू केला आहे. पण या प्रकल्पाचा फटका तिथे काम करणाऱ्या कचरा वेचकांना बसत आहे. पगार वेळेवर मिळत नाही, असा आरोप कचरा वेचक कामगारांनी केला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून सुरू झाली. याआधी विमाननगर भागात स्वच्छ संस्थेच्या सुमारे 60 कचरा वेचकांकडून घराघरांतून कचरा गोळा केला जात होता. प्रकल्प सुरू करताना सर्व विद्यमान कामगारांना नव्या प्रणालीत समाविष्ट केले जाईल, अशी खात्री महापालिकेने दिली होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही, असा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.
ठेकेदार आणि महापालिकेचा गोंधळ
या प्रकल्पासाठी महापालिकेने नवीन टेंडर काढलेले नाहीत. आधीच्या वाहनांना विमाननगरमध्ये आणून कामासाठी वापरले जात आहे. कचरा वेचकांना रस्ते झाडणीचे काम ठेकेदाराद्वारे दिले आहे, पण कामावर लक्ष ठेवणे महापालिकेचे मुकादम आणि आरोग्य निरीक्षक करत आहेत, असे कामगारांकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
कामगारांचे आरोप नेमके काय आहेत ?
view commentsकचरा वेचक कामगारांनी सांगितले की, 2 महिने झाले तरी सर्व कामगारांना कामावर घेतलेले नाही. ड्रायव्हर पदासाठी 9 जणांनी अर्ज केले होते, पण फक्त 5 जणांना कामावर ठेवण्यात आले आहे. तसेच, पगार वेळेवर मिळत नसल्याचीही तक्रार त्यांनी केली आहे. कामाची नीट व्यवस्था नसल्यामुळे कामगारांना मानसिक ताण जाणवत आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2025 7:36 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : ‘विश्वास 2025’ प्रकल्पाचा कचरा वेचकांना फटका, रोजगार आला धोक्यात, कामगारांचे नेमके म्हणणे काय?


