Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, लवकरच 5000 होणार का? व्यापाऱ्यांनी सांगितली महत्त्वाची माहिती
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळतंय. जालना शहरामध्ये 13 नोव्हेंबर रोजी सोयाबीनला 4600 रुपये एवढा हंगामातील उच्चांकी दर मिळाला.
जालना : राज्यामध्ये 15 नोव्हेंबरपासून नाफेड मार्फत हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या आवकमध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळतंय. जालना शहरामध्ये 13 नोव्हेंबर रोजी सोयाबीनला 4600 रुपये एवढा हंगामातील उच्चांकी दर मिळाला. पाहुयात आगामी काळामध्ये सोयाबीन दराची स्थिती कशी असेल.
advertisement
सोयाबीनमधील ओलावा कमी झाला असून यामुळे देखील दरावर परिणाम होत आहे. बीज तयार करणाऱ्या कंपन्या सोयाबीन खरेदी करत असून बीज क्वालिटीचे सोयाबीन पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटलने विक्री होत आहे. बाजारामध्ये दररोज दहा ते बारा हजार क्विंटलची आवक येत आहे. हीच आवक दिवाळी आधी 30,000 क्विंटल पर्यंत पोहोचली होती.
advertisement
बाजारामध्ये विस्तारा नावाच्या नवीन वाणाला सहा हजार ते 6100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. ग्रीन गोल्ड या वाणाला 4800 ते 5000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. तर फुले संगम या वाणाला 4800 प्रतिक्विंटल अशा पद्धतीचा दर मिळत आहे. तर सर्वसाधारण सोयाबीनला 10 ते 12 आर्द्रता असेल तर 4600 क्विंटल असा दर मिळत आहे.
advertisement
आगामी काळात सोयाबीनचे दर हे 5000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतात, अशी शक्यता जालना येथील व्यापारी अशोक पाचफुले यांनी लोकल 18 बरोबर बोलताना व्यक्त केली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 13, 2025 6:10 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, लवकरच 5000 होणार का? व्यापाऱ्यांनी सांगितली महत्त्वाची माहिती

