IND vs PAK : पाकिस्तानच्या जिव्हारी लागलं 'ऑपरेशन सिंदूर', इंडियन एअर फोर्सचा अपमान करायला गेला स्वत:चाच झाला गेम, पाहा Video

Last Updated:

Haris Raut Viral Video : पाकिस्तानचा खेळाडू हॅरिस रौफ याने आशिया कपमधील सुपर 4 च्या मॅचमध्ये पुन्हा भारताची खोड काढली पण त्याचीच फजिती झाल्याचं पहायला मिळालं.

IND vs PAK Haris Raut Viral Video
IND vs PAK Haris Raut Viral Video
India vs Pakistan Asia Cup 2025 : कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, अशी म्हण प्रसिद्ध आहे. तशीच गत सध्या पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्तानच्या सैन्याला आणि पाकिस्तातच्या संघाला भारतीयांना सडकून उत्तर दिल्यानंतर देखील त्यांचा माज काही कमी झाल्याचं चित्र पहायला मिळत नाही. आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानची गुर्मी पहायला मिळाली. पाकिस्तानचा बॉलर हॅरिस रौफ याने भारतीय वायुसेनेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न त्याच्याच अंगलट आल्याचं पहायला मिळतंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नेमकं काय झालं? पाहा

हॅरिस रौफला अभिषेकचा चोप

अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पावरप्लेमध्ये हॅरिस रौफ याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या खोड्या काढण्यासाठी पाकिस्तानची बॉलर्स सरसावले. हॅरिस रौफने सूर्यकुमार यादवची विकेट मिळाल्यानंतर हॅरिस उड्या मारायला लागला. पुढच्या ओव्हरमध्ये जेव्हा बॉन्ड्री लाईनवर गेला तेव्हा त्याने 6-0 ची साईन केली. याचा अर्थ पाकड्यांना असं वाटतंय की, भारतीय सैन्याचे सहा फायटर प्लेन पाकिस्तानने उडवले अन् भारताचं एकही फायटर प्लेन मारलं गेलं नाही. त्यावर हॅरिसने ही साईन केली. त्यावर भारतीयांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
advertisement
advertisement

कोहली कोहलीचा जयघोष

हॅरिस जास्त उड्या मारत असल्याचं लक्षात आल्यावर भारतीय फॅन्सने कोहली कोहलीच्या नावाचा जयघोष सुरू केला अन् हॅरिसला जमिनीवर आणलं. विराट कोहलीने हॅरिसला दोन सिक्स मारून पाकिस्तानची इज्जत काढली होती. हॅरिस रौफच्या या कृतीनंतर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. मात्र, अभिषेक शर्माने ज्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर दिलं, ते पाहून भारतीयांचं मन खुश झालंय.
advertisement

अभिषेक आणि हॅरिस यांच्या वाद

दरम्यान, हॅरिस रौफ टीम इंडियाच्या डावातील पाचवी ओव्हर टाकायला आला. रौफच्या ओव्हरमध्ये या सलामी जोडीने 12 धावा काढल्या. या दरम्यान अभिषेक आणि हॅरिस यांच्या वाद झाला. त्यावेळी अभिषेक शर्माने बोट दाखवणाऱ्या हॅरिसला आपल्या बॅटमधून उत्तर दिलं. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी धुंवाधार शतकीय भागेदारी केली अन् पाकिस्तानचा पराभव सोपा केला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानच्या जिव्हारी लागलं 'ऑपरेशन सिंदूर', इंडियन एअर फोर्सचा अपमान करायला गेला स्वत:चाच झाला गेम, पाहा Video
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement