मोठा धक्का! UPI वरून घरभाडं भरणं बंद, PhonePe-Paytmचा नवा नियम लागू

Last Updated:

RBI च्या नव्या नियमांमुळे PhonePe, Paytm, CRED सारख्या ॲप्सवर क्रेडिट कार्डने घरभाडे भरण्याची सेवा बंद झाली असून ग्राहकांना जुन्या पद्धतीने पैसे द्यावे लागतील.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
आजकाल फक्त छोटे पेमेंट नाही तर मोठे पेमेंटही UPI वरुन केले जातात. जर तुम्ही दर महिन्याला बिल, घरभाडं UPI वरुन भरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जर तुम्ही देखील फोनपे, पेटीएम किंवा क्रेड सारख्या ॲप्सचा वापर करून क्रेडिट कार्डने घरभाडे भरत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता या सर्व फिनटेक कंपन्यांनी आपल्या ॲप्सवरील भाडं भरण्याची सिस्टिम बंद केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीन नियमांमुळे हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्डचा वापर करुन UPI वरुन घरभाडं भरता येणार नाही. RBI ने 15 सप्टेंबर रोजी एक पत्रक जारी केलं. आता पेमेंट ॲग्रीगेटर आणि पेमेंट गेटवे फक्त अशाच व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करू शकतात, ज्यांच्यासोबत त्यांचा थेट करार आहे आणि ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
advertisement
याचा अर्थ, आता कोणतीही ॲप एखाद्या घरमालकाला थेट पेमेंट पाठवू शकत नाही, जोपर्यंत तो त्या प्लॅटफॉर्मवर अधिकृतपणे व्यापारी म्हणून ते उल्लेख करत नाहीत. थोडक्यात सर्वसामान्य लोक आता याचा वापर करु शकणार नाहीत.
ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
या बदलामुळे त्या सर्व ग्राहकांवर मोठा परिणाम होईल, जे क्रेडिट कार्ड वापरून भाडं भरत होते आणि त्यातून रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅक मिळवत होते. तसेच, महिन्याभरासाठी त्यांना मिळणारा व्याजरहित क्रेडिट कालावधीही आता मिळणार नाही. आता त्यांना पुन्हा जुन्या पद्धतीने, जसे की थेट बँक खात्यात पैसे हस्तांतरित करणे किंवा चेकने पैसे देणे, असे पर्याय वापरावे लागतील.
advertisement
लोकप्रिय सेवेवर बंदी का?
क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्याची सेवा खूप लोकप्रिय झाली होती. यामुळे घरमालकाला लगेच पैसे मिळत होते, तर ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट्स आणि क्रेडिट पीरियडचा फायदा होत होता. मात्र, RBI ला ही व्यवस्था योग्य वाटली नाही. कारण यामध्ये घरमालकाचे पूर्ण KYC होत नव्हते आणि फिनटेक कंपन्या मध्यस्थाची भूमिका बजावत होत्या.
advertisement
बँकांनीही आधीच घेतले होते पाऊल
बँकांनी देखील गेल्या वर्षापासूनच यावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली होती. एचडीएफसी बँकेने जून 2024 मध्येच क्रेडिट कार्डने भाडे भरण्यावर 1% शुल्क आकारायला सुरुवात केली होती. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय कार्ड्सने तर रिवॉर्ड पॉइंट्स देणे बंद केले होते. मार्च 2024 पासून अनेक ॲप्सने ही सेवा थांबवली होती. काही कंपन्यांनी नंतर KYC प्रक्रिया जोडून ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता RBI च्या नव्या नियमांमुळे यावर पूर्णपणे बंदी आली आहे.
मराठी बातम्या/मनी/
मोठा धक्का! UPI वरून घरभाडं भरणं बंद, PhonePe-Paytmचा नवा नियम लागू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement