Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचं धुमशान सुरूच, कोकणात अलर्ट, मुंबई-ठाण्यातून मोठं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: राज्यात पावसाचं धुमशान सुरूच आहे. आज गुरुवारी कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून मुंबई-ठाण्यात देखील हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
कोकणपट्टीसह मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि परिसरात पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. तरीही कोकणातील काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
गेल्या आठवडाभर मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाचा मारा झाला होता. मात्र आज हवामान विभागाने मुंबईसाठी कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. सकाळपासून वातावरण ढगाळ असले तरी दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. शहरात आजचे कमाल तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. वारे सौम्य ते मध्यम गतीने वाहतील.
advertisement
advertisement
advertisement
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. या भागांत काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतील तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. वार्याचा वेग किनारपट्टीवर थोडा जास्त जाणवेल, त्यामुळे मत्स्यव्यवसायिकांना समुद्रात जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील.