Mumbai Metro: अंधेरी-दहिसर मेट्रो प्रवाशांच्या प्रतिक्षेत! अपेक्षित टप्पा पूर्ण करण्यासाठी तब्बल 6 लाख प्रवाशांची गरज

Last Updated:

Mumbai Metro: अपेक्षित प्रवासी संख्या गाठण्यासाठी मेट्रो मार्गिकेला आणखी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Mumbai Metro: अंधेरी-दहिसर मेट्रो प्रवाशांच्या प्रतिक्षेत! अपेक्षित टप्पा पूर्ण करण्यासाठी तब्बल 6 लाख प्रवाशांची गरज
Mumbai Metro: अंधेरी-दहिसर मेट्रो प्रवाशांच्या प्रतिक्षेत! अपेक्षित टप्पा पूर्ण करण्यासाठी तब्बल 6 लाख प्रवाशांची गरज
मुंबई : अंधेरीतील डी. एन. नगर ते दहिसर पूर्व 'मेट्रो 2 अ' आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व 'मेट्रो 7'च्या प्रवासी संख्येबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पावसामुळे अनेक जण रस्ते किंवा उपनगरी रेल्वेऐवजी मेट्रोच्या प्रवासाला पसंती देताना दिसत आहेत. तरीही दोन्ही मेट्रो मार्गांना अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या गाठता आलेली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो 2 अ' मार्गिकेवरून 4 लाख 7 हजार प्रवासी आणि तर मेट्रो 7 मार्गिकेवरून 5 लाख 29 हजार प्रवासी दररोज प्रवास करतील, असा दावा 'एमएमआरडीए'कडून केला जात होता. यानुसार, दोन्ही मेट्रो मार्गिकांवर मिळून दररोज 9 लाख 36 हजार प्रवासी अपेक्षित होते. मात्र, अद्याप प्रवासी संख्या 3 लाख 40 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे अपेक्षित प्रवासी संख्या गाठण्यासाठी या मेट्रो मार्गिकेला आणखी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
advertisement
'एमएमएमओसीएल'ने केलेल्या दाव्यानुसार, या मेट्रोवर 16 सप्टेंबर रोजी एका दिवसात 3 लाख 40 हजार प्रवाशांनी प्रवास केला. 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' मार्गिकेने 18 जून रोजी प्रवासी संख्येचा 2 लाख 94 हजारांचा आकडा पार केला होता. तर 8 जुलैला पहिल्यांदा 3 लाख 1 हजार 127 हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दोन महिन्यांतच आता जवळपास 40 हजार जास्त प्रवासी मेट्रोकडे वळले आहेत.
advertisement
प्रवासी संख्या वाढल्याने 'एमएमएमओसीएल'च्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. मेट्रो प्रवासी वाढत असल्यामुळे 'एमएमआरडीए'कडून या मार्गिकेवर अतिरिक्त गाड्या दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन गाड्यांतील अंतर घटले असून, प्रवाशांचा प्रवास जलद झाला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Metro: अंधेरी-दहिसर मेट्रो प्रवाशांच्या प्रतिक्षेत! अपेक्षित टप्पा पूर्ण करण्यासाठी तब्बल 6 लाख प्रवाशांची गरज
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement