Metro-3: दक्षिण मुंबईचा प्रवास होणार सुस्साट! 'या' दिवशी होणार मेट्रो-3च्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन

Last Updated:

Metro-3: मेट्रो-3 मार्गातील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा शेवटचा टप्पा देखील नागरिकांच्या सेवेत येणार आहे.

दक्षिण मुंबईचा प्रवास होणार सुस्साट! 'या' दिवशी होणार मेट्रो-3च्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन
दक्षिण मुंबईचा प्रवास होणार सुस्साट! 'या' दिवशी होणार मेट्रो-3च्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन
मुंबई : दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील (लाईन) आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा शेवटचा टप्पा 30 सप्टेंबरपासून प्रवासांच्या सेवेत दाखल होणार आहे. आरे जेव्हीएलआर ते कफ परेड प्रवासासाठी सध्या दीड ते पाऊण तास लागतो. मेट्रोमुळे हा प्रवास तासाभरात करता येणार आहे. आरे ते कफ परेड प्रवास 58 मिनिटांत शक्य होणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचं बांधकाम आणि संचालनाची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर (एमएमआरसी) आहे. एमएमआरसीने, 33.5 किलोमीटर मेट्रो मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा मे 2025 मध्ये कार्यान्वित केला आहे. आता या मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा शेवटचा टप्पा देखील नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
advertisement
तिकीट किती?
आरे ते कफ परेड प्रवासासाठी रस्ते मार्गे दीड ते पाऊण तास किंवा गर्दीच्या वेळी त्यापेक्षाही अधिक वेळ लागतो. भुयारी मेट्रोने केवळ 58 मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे. या प्रवासासाठी पहिल्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी 70 रुपये इतका तिकीट दर राहाण्याची शक्यता आहे, अशी माहिती एमएमआरसी सूत्रांनी दिली.
advertisement
शेवटच्या टप्प्यामुळे दक्षिण मुंबईतील अत्यंत गर्दीची ठिकाणे मेट्रोने जोडली जाणार आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी अतिजलद पोहचणे प्रवाशांना सोपे होणार आहे. सरकारी, खासगी कार्यालयांची संख्या ज्या चर्चगेट, सीएसएमटी, कफ परेड आदी भागात आहे त्या भागांना जोडणारी ही पहिली मेट्रो मार्गिका असणार आहे.
आरे ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा कार्यान्वित झाल्यापासून प्रवाशांना दादर, प्रभादेवी, वरळी गाठण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. तर आता लवकरच महालक्ष्मी, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड गाठता येणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Metro-3: दक्षिण मुंबईचा प्रवास होणार सुस्साट! 'या' दिवशी होणार मेट्रो-3च्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement