Worli Flyover: वरळीतील वाहतुकीचा ताण कमी होणार! उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट

Last Updated:

Worli Flyover: महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी, वरळी उड्डाणपूल आणि वांद्रे ते धारावी येथील उड्डाणपूल कामाची पाहणी केली.

Worli Flyover: महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी, वरळी उड्डाणपूल आणि वांद्रे ते धारावी येथील उड्डाणपूल कामाची पाहणी केली.
Worli Flyover: महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी, वरळी उड्डाणपूल आणि वांद्रे ते धारावी येथील उड्डाणपूल कामाची पाहणी केली.
मुंबई: महानगरी मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. यावर उपाय म्हणून ठिकठिकाणी उड्डाणपूल आणि कायवॉक बांधले जात आहेत. वरळी येथील ई. मोझेस मार्ग आणि डॉ. अॅनी बेझंट मार्गादरम्यान असलेल्या नाल्यावर देखील उड्डाणपूल बांधला जात आहे. याशिवाय, वांद्रे ते धारावी दरम्यान देखील उड्डाणपुलाची पुनर्बांधणी सुरू आहे. या पूलांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी, वांद्रे ते धारावी येथील उड्डाणपूल, वरळीतील ई मोझेस मार्ग आणि डॉ. अॅनी बेझंट मार्ग यांच्या दरम्यानच्या नाल्यावर उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि वांद्रे येथील स्कायवॉक कामाची पाहणी केली.
वरळी येथील ई. मोझेस मार्ग आणि डॉ. अॅनी बेझंट मार्गादरम्यान असलेल्या नाल्यावर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामाची देखील बांगर यांनी पाहणी केली. या पुलामुळे दोन्ही प्रमुख मार्गांना थेट जोडणी मिळेल. हा पूल पूर्ण झाल्यानंतर वरळी नाका, महालक्ष्मी व लोअर परळ परिसरातील वाहतुकीवरील ताण लक्षणीय प्रमाणात कमी होईल. सद्यस्थितीत या पुलाचं 30 टक्के काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.
advertisement
मिठी नदी पात्र रुंदीकरणाअंतर्गत वांद्रे ते धारावी दरम्यान पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे. नदीच्या प्रवाहाला कमीत कमी अडथळा व्हावा, या उद्देशाने उड्डाणपुलाचं काम दोन टप्प्यांत केलं जात आहे. पहिल्या टप्प्यातील पुलाचं बांधकाम 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेनं निश्चित केलं आहे. त्यामुळे कॉजवेकडे उड्डाणपुलावर थेट प्रवेश मिळणार आहे. याशिवाय, वांद्रे ते म्हाडा स्कायवॉक देखील डिसेंबर 2025 पर्यंत सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.
advertisement
अभिजीत बांगर म्हणाले, "पहिल्या टप्प्यात उभारलेल्या उड्डाणपुलाचं बांधकाम 90 टक्के पूर्ण झालं आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. यानंतर दक्षिणेकडील दोन मार्गिका (लेन) सुरू होतील. माहीम कॉजवेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर थेट प्रवेश मिळणार असून वाहतुकीचा वेग वाढेल. दुसऱ्या टप्प्याचं काम देखील लवकरच सुरू केलं जाईल. हे काम 18 महिन्यांत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे."
advertisement
वांद्रे रेल्वे स्टेशन ते म्हाडा कार्यालयादरम्यान महापालिकेच्या माध्यमातून स्कायवॉकची पुनर्बांधणी सुरू आहे. हाय कोर्टाच्या आदेशानुसार हा स्कायवॉक डिसेंबर 2025 पूर्वी वापरासाठी खुला व्हावा, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. सध्या स्कायवॉकचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Worli Flyover: वरळीतील वाहतुकीचा ताण कमी होणार! उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement