advertisement

Do You Know : 1 तासात 60 मिनिटेच का असताता 100 मिनिटं का नाहीत? 99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर

Last Updated:
Do You Know : 1 तासात 100 मिनिटे का नसतात? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात चक्क 5000 वर्षे मागे जावे लागेल.
1/8
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत घड्याळाकडे लक्ष देत असतो.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत घड्याळाकडे लक्ष देत असतो. "अजून १० मिनिटे आहेत", "अर्धा तास बाकी आहे", असे संवाद आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. पण तुम्ही कधी शांतपणे बसून विचार केला आहे का, की आपल्या व्यवहारातील बहुतेक गोष्टी शंभरच्या पटीत असतात. जसे की 1 रुपयात 100 पैसे किंवा 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर, मग वेळेच्या बाबतीत मात्र हा '100' चा आकडा का वापरला जात नाही?
advertisement
2/8
1 तासात 100 मिनिटे का नसतात? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात चक्क 5000 वर्षे मागे जावे लागेल.
1 तासात 100 मिनिटे का नसतात? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात चक्क 5000 वर्षे मागे जावे लागेल.
advertisement
3/8
5000 वर्षांपूर्वीचं ते 'जादुई' गणितआज आपण गणितात 10 या अंकावर आधारित 'दशमान पद्धत' (Decimal System) वापरतो. मात्र, 5000 वर्षांपूर्वी मेसोपोटेमियामध्ये राहणाऱ्या सुमेरियन आणि बॅबिलोनियन संस्कृतीच्या लोकांनी वेळ मोजण्यासाठी एक वेगळी पद्धत शोधली होती. त्यांनी 'षट्दशमलव-आधार 60' (Sexagesimal System) म्हणजेच 60 या अंकावर आधारित पद्धतीचा वापर केला. आज आपण जे घड्याळ वापरतो, ते याच प्राचीन पद्धतीची देणगी आहे.

4/8
60 हाच आकडा का निवडला?बॅबिलोनियन लोकांनी 60 हा आकडा निवडण्यामागे एक अत्यंत हुशार विचार होता. तो म्हणजे 'विभाज्यता'.
60 हाच आकडा का निवडला?बॅबिलोनियन लोकांनी 60 हा आकडा निवडण्यामागे एक अत्यंत हुशार विचार होता. तो म्हणजे 'विभाज्यता'.
advertisement
5/8
उदाहरणार्थ, 10 या अंकाला केवळ 2 आणि 5 ने पूर्ण भाग जातो.याउलट, 60 हा एक 'मॅजिक नंबर' आहे. 60 ला एकूण 12 अंकांनी (1, 2, 3, 4, 5, 6, 10, 12, 15, 20, 30 आणि 60) नि:शेष भाग जातो.
यामुळेच वेळेचे भाग करणे अतिशय सोपे जाते. यामुळेच आपण 'पाऊण तास' (४५ मि.), 'अर्धा तास' (30 मि.) किंवा 'पाव तास' (15 मि.) असे अचूक भाग विनासायास करू शकतो. जर 1 तास 100 मिनिटांचा असता, तर त्याचे 3 किंवा 6 समान भाग करणे कठीण झाले असते.
उदाहरणार्थ, 10 या अंकाला केवळ 2 आणि 5 ने पूर्ण भाग जातो.याउलट, 60 हा एक 'मॅजिक नंबर' आहे. 60 ला एकूण 12 अंकांनी (1, 2, 3, 4, 5, 6, 10, 12, 15, 20, 30 आणि 60) नि:शेष भाग जातो.यामुळेच वेळेचे भाग करणे अतिशय सोपे जाते. यामुळेच आपण 'पाऊण तास' (४५ मि.), 'अर्धा तास' (30 मि.) किंवा 'पाव तास' (15 मि.) असे अचूक भाग विनासायास करू शकतो. जर 1 तास 100 मिनिटांचा असता, तर त्याचे 3 किंवा 6 समान भाग करणे कठीण झाले असते.
advertisement
6/8
'मिनिट' आणि 'सेकंद' ही नावे कुठून आली?वेळेच्या या विभागणीला लॅटिन भाषेतून नावे मिळाली आहेत.
Minuta (मिनिट): लॅटिनमध्ये तासाच्या पहिल्या लहान विभागाला 'Pars Minuta Prima' (पहिला छोटा भाग) म्हटले जाते. यातूनच 'मिनिट' हा शब्द रूढ झाला.
Second (सेकंद): मिनिटाच्या पुढच्या म्हणजेच दुसऱ्या लहान विभागाला 'Pars Minuta Secunda' (दुसरा छोटा भाग) म्हटले जाते. यातील 'Secunda' शब्दावरून 'सेकंद' हे नाव पडले.
'मिनिट' आणि 'सेकंद' ही नावे कुठून आली?वेळेच्या या विभागणीला लॅटिन भाषेतून नावे मिळाली आहेत.Minuta (मिनिट): लॅटिनमध्ये तासाच्या पहिल्या लहान विभागाला 'Pars Minuta Prima' (पहिला छोटा भाग) म्हटले जाते. यातूनच 'मिनिट' हा शब्द रूढ झाला.Second (सेकंद): मिनिटाच्या पुढच्या म्हणजेच दुसऱ्या लहान विभागाला 'Pars Minuta Secunda' (दुसरा छोटा भाग) म्हटले जाते. यातील 'Secunda' शब्दावरून 'सेकंद' हे नाव पडले.
advertisement
7/8
वर्तुळाचे 360 अंश आणि 60 चे नातेकेवळ वेळच नाही, तर भूमितीमधील वर्तुळाचे माप 360 अंश असण्यामागेही बॅबिलोनियन लोकांची हीच पद्धत कारणीभूत आहे. 60 ला 6 ने गुणले की 360 येतात, ज्याचा वापर त्यांनी खगोलशास्त्र आणि नकाशे तयार करण्यासाठी केला.

8/8
आज जग कितीही आधुनिक झाले असले आणि आपण नवनवीन तंत्रज्ञान वापरत असलो, तरी 5000 वर्षांपूर्वीच्या मानवाने लावलेला हा शोध आजही आपल्या आयुष्याची प्रत्येक सेकंदाची गती ठरवत आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वेळेकडे पाहाल, तेव्हा या प्राचीन संस्कृतीच्या हुशारीची आठवण नक्की येईल.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement