बॉक्स ऑफिसवर Border 2 चा राडा, याच गदारोळात 'बॉर्डर ३' ची अधिकृत घोषणा, कधी रिलीज होणार फिल्म?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
'बॉर्डर २' च्या यशाची चव चाखत असतानाच, निर्माते भूषण कुमार यांनी एका सिनेमाबाबत मोठा खुलासा केला आहे. 'बॉर्डर ३' लवकरच येणार, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
मुंबई : थिएटरमध्ये सध्या फक्त एकच आवाज घुमतोय... तो म्हणजे 'हिंदुस्तान जिंदाबाद'चा. सनी देओलच्या 'बॉर्डर २' ने बॉक्स ऑफिसवर असा काही धुमाकूळ घातला आहे की, जुन्या रेकॉर्ड्सच्या चिंधड्या उडाल्या आहेत. पण चित्रपटप्रेमींसाठी हा तर फक्त ट्रेलर होता. कारण 'बॉर्डर २' च्या यशाची चव चाखत असतानाच, निर्माते भूषण कुमार यांनी एका सिनेमाबाबत मोठा खुलासा केला आहे. 'बॉर्डर ३' लवकरच येणार, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
तीन दिवसांत १६७ कोटी; 'बॉर्डर २' मुळे बॉक्स ऑफिस दणाणलं
अनुराग सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'बॉर्डर २' ने प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच जगभरात १६७ कोटी रुपयांचा गल्ला जमवून बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली आहे. टी-सीरीज आणि अनुराग सिंह यांची ही पहिलीच भागीदारी प्रेक्षकांना वेड लावून गेली आहे. तब्बल २९ वर्षांनंतर जेव्हा 'संदेसे आते हैं'ची धून पुन्हा मोठ्या पडद्यावर ऐकू आली, तेव्हा प्रत्येक भारतीयाचं रक्त सळसळलं. प्रेक्षकांचं हेच प्रेम पाहून भूषण कुमार यांनी तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
advertisement
'बॉर्डर ३' येणार, पण कधी?
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत भूषण कुमार यांनी स्पष्ट केलं की, "बॉर्डर ही केवळ एक फिल्म नाही, तर ती एक इमोशन आहे. ३० वर्षांनंतर या कथेला जे प्रेम मिळालंय, ते पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. 'बॉर्डर ३' नक्कीच बनणार, यात कोणतीही शंका नाही. मात्र, तो आमचा पुढचा लगेचचा प्रोजेक्ट नसेल. आम्हाला त्यासाठी योग्य कथेची आणि योग्य वेळेची वाट पाहावी लागेल."
advertisement
10 मिनिट 30 सेकंदाचं गाणं, ज्याने सोनू निगमला मिळवून दिलेला फिल्मफेअर, मग गायकाने नाकारला का अवॉर्ड?
निर्मात्यांनी असंही सांगितलं की, 'बॉर्डर २' करण्याआधी दिग्दर्शक अनुराग सिंह आणि भूषण कुमार एका दुसऱ्या वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत होते. त्यामुळे आधी तो प्रोजेक्ट पूर्ण केला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा 'बॉर्डर ३' ची गर्जना केली जाईल.
advertisement
'बॉर्डर २' मधील जबरदस्त स्टार कास्ट
२३ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. केवळ पुरुष कलाकारांनीच नाही, तर सोनम बाजवा हिनेही आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. १९९७ च्या मूळ 'बॉर्डर'चा वारसा या चित्रपटाने अत्यंत ताकदीने पुढे नेला आहे.
advertisement
प्रजासत्ताक दिनी चाहत्यांना मोठी भेट
आज जेव्हा अवघा देश ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा 'बॉर्डर ३' च्या या बातमीने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. सनी पाजींचा पडद्यावरचा वावर आणि त्याला मिळालेली तरुण स्टार्सची जोड यामुळे 'बॉर्डर'ची ही फ्रेंचाइजी आता भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठी 'वॉर फिल्म' सीरीज ठरली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 8:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉक्स ऑफिसवर Border 2 चा राडा, याच गदारोळात 'बॉर्डर ३' ची अधिकृत घोषणा, कधी रिलीज होणार फिल्म?









