डोंबिवलीतील भाविकांवर काळाचा घाला, क्रुझर आणि कंटेनरची धडक, 3 जणांचा मृत्यू, 6 जखमी
- Reported by:Virendrasigh Utpat
- Published by:Sachin S
Last Updated:
भाविकांनी भरलेली क्रुझर रेल्वे स्थानकाकडे निघाले होते. शारदानगरजवळ पोहोचले असता अचानक समोर आलेल्या कंटेनरला समोरासमोर धडक झाली.
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव कंटेनर आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ६ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवदर्शनासाठी आलेले भाविक असून सर्व राहणार डोंबिवलीतील असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर शारदनगरजवळ सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. क्रुझरमधील भाविक हे डोंबिवली इथं राहणार आहे. डोंबिवली येथील भाविक तुळजापूर आणि अक्कलकोटच्या देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून हे भाविक मुंबईकडे रेल्वेनं जाणार होते. भाविकांनी भरलेली क्रुझर रेल्वे स्थानकाकडे निघाले होते. शारदानगरजवळ पोहोचले असता अचानक समोर आलेल्या कंटेनरला समोरासमोर धडक झाली.
advertisement
हा अपघात इतका भीषण होता की, भाविकांनी भरलेली क्रुझर पलटली झाली. गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली आणि जखमी रुग्णांना बाहेर काढलं. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. नेमका हा अपघात कसा आणि का झाला. याबद्दल पोलीस तपास करत आहे. या अपघातामुळे पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्यात आली आहे.
Location :
Pandharpur,Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 10:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डोंबिवलीतील भाविकांवर काळाचा घाला, क्रुझर आणि कंटेनरची धडक, 3 जणांचा मृत्यू, 6 जखमी






