Guru Pushyamrut: घेतलेलं सोनं, प्रॉपर्टी डबल..! खरेदीसाठीचा सर्वात चांगला मुहूर्त 6.29 पासून सुरू झाला

Last Updated:

Guru Pushyamrut 2025: गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो, तेव्हा हा योग तयार होतो. 'गुरु' म्हणजे बृहस्पती आणि 'पुष्य' म्हणजे पोषण करणारा, ऊर्जा देणारा. त्यामुळे या दोन्ही शुभ गोष्टींचा संगम झाल्याने हा योग विशेष फलदायी मानला जातो.

News18
News18
मुंबई : शुभ मुहूर्तावर खरेदी करणं लाभदायी मानलं जातं. कित्येक लोक आजही मोठी खरेदी करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहतात. खरेदी करण्यासाठी पंचागातील काही शुभ मुहूर्त अतिशय खास मानले जातात. आज गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. हा योग ज्योतिषशास्त्रानुसार एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा योग मानला जातो. गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो, तेव्हा हा योग तयार होतो. 'गुरु' म्हणजे बृहस्पती आणि 'पुष्य' म्हणजे पोषण करणारा, ऊर्जा देणारा. त्यामुळे या दोन्ही शुभ गोष्टींचा संगम झाल्यानं हा योग विशेष फलदायी मानला जातो.
गुरुपुष्यामृत योगाचे धार्मिक महत्त्व - गुरुपुष्यामृत योग हा कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. या दिवशी केलेल्या कामांमध्ये यश आणि समृद्धी मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे. धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते.
नवीन व्यवसाय, शिक्षण किंवा कोणताही महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी हा दिवस खूप चांगला मानला जातो. पूजा-अर्चा, जप-तप, अनुष्ठान आणि मंत्र सिद्धीसाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी केलेल्या धार्मिक कार्यांचे फळ लवकर मिळते, असे म्हणतात. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन आणि समृद्धी येते. अनेकजण या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करतात, कारण त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो, असे मानले जाते.
advertisement
खरेदी विधी आणि परंपरा - गुरुपुष्यामृत योग हा खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी खरेदी केल्यानं त्या वस्तूमध्ये स्थायित्व येते आणि त्याचे चांगले फळ मिळते, असे मानले जाते. या दिवशी सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टी खरेदी करणं शुभ मानलं जातं, ते आपल्यासोबत कायम राहतं शिवाय त्यात चांगली वाढ होते, असे मानले जाते. या दिवशी खरेदी करताना काही खास परंपरा पाळल्या जातात.
advertisement
या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मी येते आणि आर्थिक प्रगती होते अशी श्रद्धा आहे. नवीन वाहन, घर किंवा इतर कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्यासाठी हा योग शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात. अनेक लोक या दिवशी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात, कारण त्यांचा वापर दीर्घकाळ आणि विनाअडथळा व्हावा अशी इच्छा असते. या दिवशी नवीन मूर्ती, पूजा-पाठ साहित्य, किंवा धार्मिक ग्रंथ खरेदी करणेही शुभ मानले जाते.
advertisement
या दिवशी खरेदी करताना, ती वस्तू आणण्यापूर्वी तिची पूजा करणे आणि घरात आणल्यानंतर ती शुभ मुहूर्तावर स्थापित करणे महत्त्वाचे मानले जाते. असे केल्याने त्या वस्तूचे शुभ परिणाम मिळतात. गुरुपुष्यामृत योग हा शुभ कार्यांना सुरुवात करण्यासाठी, तसेच धन, समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. आज सकाळी 6.29 वाजल्यापासून उद्या सकाळी 6.31 पर्यंतच्या वेळात कधीही खरेदी करू शकता. त्याचे चांगले फळ मिळेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Guru Pushyamrut: घेतलेलं सोनं, प्रॉपर्टी डबल..! खरेदीसाठीचा सर्वात चांगला मुहूर्त 6.29 पासून सुरू झाला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement