Election Commission On Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपावर उत्तर देताना निवडणूक आयोग फसलं? एका गोष्टीची दिली कबुली
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Election Commission On Rahul Gandhi : केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले. पण, त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरात सेल्फ गोल्फ झाला का, याची चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी व्होट चोरीचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुराव्यासह मतदारांची नावे जाणिवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले. पण, त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरात सेल्फ गोल्फ झाला का, याची चर्चा रंगली आहे.
राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनाच लक्ष्य केले. लोकशाहीविरोधातील लोकांना निवडणूक आयोगाने मदत केली असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातील मतदार वगळण्याचे प्रकरण समोर आणलं. कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातून 6018 मतदारांची नावं वगळण्यात आल्याचा दावा केला. मतदारांना कल्पनाच नाही की त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. दलित, अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदारयादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली. यात विशेषत: काँग्रेसच्या मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटक बाहेरील मोबाइल क्रमांकावरून मतदारांची नावे वगळण्यात आली. अर्ज कोणी केले, ओटीपी कोणाला गेले, हे सगळं संशयास्पद असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. सुर्यकांत नावाच्या व्यक्तीने 14 मिनिटांत 12 नावे वगळले असल्याचे सांगितले.
advertisement
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपावर 5 मुद्यांसह उत्तरे दिली. राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. कोणलाही, कोणत्याही मतदाराला ऑनलाइन पद्धतीने कोणतेही मत वगळता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने पुढे म्हटले की, संबंधित व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही मत वगळता येणार नाही. निवडणूक आयोगाने म्हटले की, 2023 मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच एफआयआर दाखल केला असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
advertisement
निवडणूक आयोगाचा सेल्फ गोल?
राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आळंद मतदारसंघातून काही नावे वगळण्यात आली. यामध्ये एका बीएलओच्या नातेवाईकांचेही नाव मतदारयादीतून वगळण्यात आले. याबाबत त्यांनी नातेवाईक असलेल्या बीएलओने या प्रकरणाची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना आपल्या शेजाऱ्याने नाव मतदारयादीतून वगळलं असल्याचे सांगितले. त्याची विचारणा केल्यानंतर शेजाऱ्याने आपणं असे काही केलं नसल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरण समोर आले असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
advertisement
तर, दुसरीकडे निवडणूक आयोगाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले की, 2023 मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच एफआयआर दाखल केला. निवडणूक आयोगाने मतदारयादीतील नाव वगळण्याबाबत प्रयत्न झाल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे मतदारयादीतून नाव वगळण्यात आल्याचा प्रकार घडला असल्याच्या दाव्याला आणखीच बळ मिळाले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या या उत्तरावरून चांगलाच वाद रंगण्याची शक्यता आहे.
advertisement
कर्नाटक सीआयडीकडून तपास, निवडणूक आयोगावर राहुल गांधींचे आरोप...
कर्नाटक सीआयडीने या मतदार वगळण्याच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 18 अर्ज केले. आम्हाला ओटीपी ट्रेस, मोबाइल क्रमांक, कोणाच्या नावावर नंबर रजिस्टर आहे, अशी सगळी तांत्रिक माहिती मागितली. मात्र, निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
advertisement
मतदारयादीतून नावे वगळण्याच्या तक्रारीवर 23 फेब्रुवारी तपास सुरू झाला. मार्च महिन्यात काही पुरावे समोर आले. निवडणूक आयोगाला सीआयडीने पुढील काही दिवसात पत्र लिहिले.. ऑगस्टमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने अपूर्ण माहिती दिली, ज्याचा तपासात काहीच फायदा होणार नव्हता. सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला 18 वेळा स्मरण पत्रे पाठवली. त्यालाही उत्तर मिळाले नाही. कर्नाटक निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली, त्यांना उत्तर दिले नाही. ज्ञानेश्वर कुमार हे व्होट चोरीतील आरोपींना वाचवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
September 18, 2025 1:56 PM IST
मराठी बातम्या/देश/
Election Commission On Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपावर उत्तर देताना निवडणूक आयोग फसलं? एका गोष्टीची दिली कबुली