Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा धमाका, वोट चोरी प्रकरणी मतदारांनाच समोर आणलं, निवडणूक आयुक्तांवर खळबळजनक आरोप
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Rahul Gandhi On Vote Chori : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी व्होट चोरी प्रकरणात नवा गौप्यस्फोट केला. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी व्होट चोरीला मदत केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी कशी व्होट चोरांना लोकशाहीविरोधातील लोकांना कशी मदत केलीय हे सांगणार आहे. मतचोरी कशी झाली, मते कशी बदलली हे पुराव्यानिशी मांडणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातून 6018 मतदारांची नावं वगळण्यात आली. मतदारांना कल्पनाच नाही की त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. दलित, अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदारयादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली. यात विशेषत: काँग्रेसच्या मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
advertisement
कर्नाटक बाहेरील मोबाइल क्रमांकावरून मतदारांची नावे वगळण्यात आली. अर्ज कोणी केले, ओटीपी कोणाला गेले, हे सगळं संशयास्पद असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. सुर्यकांत नावाच्या व्यक्तीने 14 मिनिटांत 12 नावे वगळण्याचे अर्ज भरण्यात आले.
LIVE: Special Press Conference - Vote Chori Factory https://t.co/ne8cdFCnMs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 18, 2025
advertisement
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत मतदारयादीतून नाव वगळलेल्या सूर्यकांत यांनी सांगितले की, माझ्या नावावरून 12 जणांची नावे वगळण्यात आली. मी कोणालाही मेसेज केला नाही, मी मतदारयादीतून नावं वगळण्याबाबत कोणताही अर्ज केला नव्हता.
काँग्रेसला ज्या बुथवर सर्वाधिक मते मिळाली, त्याच बुथवरील मतदारांना वगळण्यात आले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. व्होट चोरीला निवडणूक आयोगाकडून मदत केली जात आहे. कर्नाटक सीआयडीने या मतदार वगळण्याचा तपास सुरू केला. सीआयडीने 18 अर्ज केले. आम्हाला ओटीपी ट्रेस, मोबाइल क्रमांक, कोणाच्या नावावर नंबर रजिस्टर आहे, अशी सगळी तांत्रिक माहिती मागितली. मात्र, निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
New Delhi,Delhi
First Published :
September 18, 2025 11:19 AM IST
मराठी बातम्या/देश/
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा धमाका, वोट चोरी प्रकरणी मतदारांनाच समोर आणलं, निवडणूक आयुक्तांवर खळबळजनक आरोप