Konkan Railway: एका क्लिकवर मिळणार कोकण रेल्वेची A टू Z माहिती, प्रवाशांसाठी 'केआर मिरर' लाँच
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Konkan Railway: प्रवाशांना रेल्वेगाड्यांची सद्यस्थिती आणि तपशीलवार वेळापत्रक पाहता येणार आहे.
रत्नागिरी: महाराष्ट्रातील रेल्वे वाहतुकीमध्ये कोकण रेल्वेचा सिंहाचा वाटा आहे. दररोज हजारो प्रवासी कोकण रेल्वे सेवेचा लाभ घेतात. आपल्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने आपली सेवा देखील अपग्रेड केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रवाशांच्या सोयीसाठी 'केआर मिरर' हे नवे मोबाईल ॲप लाँच केलं आहे. हे मोबाईल ॲप प्रवाशांना आधुनिक आणि सर्वसमावेशक डिजिटल अनुभव देणारं आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासादरम्यान लागणारी सर्व माहिती अगदी सहज एका क्लिकवर मिळणार आहे.
कोकण रेल्वेचे हे ॲप मराठीसह चार भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये प्रवाशांना रेल्वेगाड्यांची सद्यस्थिती आणि तपशीलवार वेळापत्रक पाहता येणार आहे. स्टेशन्ससह रेल्वेतील केटरिंग सेवा, महिला प्रवाशांसाठी खास सुविधा आणि विविध हेल्पलाइन क्रमांक यांची माहिती देण्यात आली आहे. अॅपमध्ये कोकण रेल्वेचा इतिहास, मैलाचे दगड आणि विविध प्रकल्पांची माहिती देखील दिली गेली आहे.
advertisement
इतकंच नाहीतर कोकणातील प्रसिद्ध स्थळांची माहिती देखील या ॲपमध्ये उपलब्ध आहे. हे ॲप कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाशी जोडलेलं असल्याने सर्व अधिकृत माहिती सहज मिळू शकणार आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवासादरम्यान सुरक्षा जागरूकता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे. उत्सवकाळात कोकणात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
advertisement
गणेशोत्सवामध्ये जादा गाड्या चालवल्यानंतर आता दसरा आणि दिवाळीत देखील कोकण रेल्वेत मोठी प्रवाशांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी अशी विशेष साप्ताहिक रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत असेल.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
September 22, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Konkan Railway: एका क्लिकवर मिळणार कोकण रेल्वेची A टू Z माहिती, प्रवाशांसाठी 'केआर मिरर' लाँच