Weather Alert: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वारं फिरलं, कोकणात मुसळधार, मुंबई-ठाण्याला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आज मुंबईसह कोकणातील सहाही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
.कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या सातही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या सातही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून जोरदार सरी बरसतील. नवरात्र उत्सवाला मुंबईत जोरदार सुरुवात झाली असली तरी पाऊस सुद्धा मुंबईत जोरदार पडणार असल्याचं हवामान विभागाने संगीतले आहे. आज होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. वार्‍याचा वेग मध्यम राहणार आहे.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज पावसाचा जोर वाढणार आहे. मुसळधार सरींमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवेवर परिणाम होऊ शकतो. कमाल तापमान 28–29अंश सेल्सिअस राहील. हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आजही मुसळधार सरींचा अंदाज असून काही भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेग मध्यम ते जोरदार राहील. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील.

5/5
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कमाल तापमान सरासरी 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24–25 अंश सेल्सिअस राहील.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement