OTT Release This Week : 'या' आठवड्यात मनोरंजनाचा तडका! रिलीज होतायत 25 पेक्षा अधिक मूव्ही आणि सीरिज

Last Updated:

OTT Release This Week : ओटीटीवर या आठवड्यात तब्बल 25 चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.

News18
News18
OTT Release This Week : सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सिनेप्रेमींसाठी खूपच खास असणार आहे. दरम्यान ओटीटीवर मनोरंजनाचा खजिना उघडला जाणार आहे. नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, झी 5 अशा वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक सरस वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. साऊथ ते बॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपटांसह वेब सीरिज प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल 25 चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल...
1) धडक 2
सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा 'धडक 2' हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. 26 सप्टेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
2) जनावर
भुवन अरोडा अभिनीत 'जनावर' या सीरिजची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. क्राइम, ड्रामा असणारी ही सीरिज 26 सप्टेंबरला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
advertisement
3) हृदयपूर्वम
दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलालचा 'हृदयपूर्वम' हा चित्रपट 26 सप्टेंबरला जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. 28 ऑगस्टला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.
4) सुंदरकांड
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'सुंदरकांड' हा तेलुगू भाषेतील चित्रपट ओटीटीव रिलीजसाठी सज्ज आहे. हा एक रोमँटिक कौटुंबिक, मनोरंजनात्मक चित्रपट असून 'सुंदरकांड' 23 सप्टेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
advertisement
5) सरकीत
'सरकीत' हा मल्याळम चित्रपट 8 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 26 सप्टेंबर रोजी मनोरमा मॅक्सवर प्रदर्शित केला जाईल.
6) शो टू मच
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा 'शो टू मच' हा नवा कार्यक्रम प्राईम व्हिडीओवर सुरू होत आहे. 25 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होईल.
advertisement
7) चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है
नवरात्रीच्या निमित्ताने 'चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है' हा भक्तिमय शो प्रदर्शित केला जाणार आहे.
8) मिलियन डॉलर लिस्टिंग इंडिया सीझन 2
'मिलियन डॉलर लिस्टिंग इंडिया सीझन 2' तुम्ही सोनी लिववर पाहू शकता.
9) रिअ‍ॅलिटी रानीज ऑफ द जंगल सीझन 2
'रिअ‍ॅलिटी रानीज ऑफ द जंगल सीझन 2' देखील 22 सप्टेंबर रोजी डिस्कवरी+ वर प्रदर्शित होणार आहे.
advertisement
10) तुलसा किंग सीझन 3
'तुलसा किंग सीझन 3' 22 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.
11) होटल कोस्टिएरा
'होटल कोस्टिएरा' 24 सप्टेंबरपासून प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
12) मार्व्हल जॉम्बीज
'मार्व्हल जॉम्बीज' तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
13) सिक्सर सीझन 2
'सिक्सर सीझन 2' देखील 24 सप्टेंबरपासून अमेझॉन एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होणार आहे.
advertisement
14) स्लो हॉर्सेस सीझन 5
सर्वाधिक प्रतीक्षित 'स्लो हॉर्सेस सीझन 5' ही सीरिज अॅपल टीव्ही+ वर प्रदर्शित होईल.
15) द डेव्हिल इज बिझी
'द डेव्हिल इज बिझी' देखील तुम्ही 24 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
16) ऐलिस इन बॉर्डरलंड सीझन 3
'ऐलिस इन बॉर्डरलंड सीझन 3' 25 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर सुरू होत आहे.
17) टू मच विद काजोल अॅन्ड ट्विंकल
'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' हा टॉक शोदेखील 25 सप्टेंबरपासून प्रत्येक गुरुवारी प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
advertisement
18) वेवार्ड
'वेवार्ड' देखील 25 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
19) डेंजरम एनिमल्स
डेंजरम एनिमल्स 26 सप्टेंबरपासून प्रेक्षक लायंसगेट प्लेवर पाहू शकतात.
20) सन ऑफ सरदार 2
अक्षय देवगनचा 'सन ऑफ सरदार 2' हा विनोदी चित्रपटही नेटफ्लिक्सवर 26 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
21) ओडुम कुथिरा चादुम कुथिरा
ओडुम कुथिरा चादुम कुथिरा हा दाक्षिणात्य चित्रपट 26 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.
22) सुमती वलावु
सुमती वलावु हा चित्रपट येत्या 26 सप्टेंबरला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.
23) द सीरियल किलर्स अप्रेंटिस
द सीरियल किलर्स अप्रेंटिस डिस्कवरी+ वर स्ट्रीम होणार आहे.
24) बिग बॉस कन्नड सीजन 12
'बिग बॉस कन्नड सीजन 12' 28 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होण्यास सज्ज आहे.
25) डेथ ऑफ अ यूनिकॉर्न
डेथ ऑफ अ यूनिकॉर्न 28 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
26) द फ्रेंड
द फ्रेंड 28 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Release This Week : 'या' आठवड्यात मनोरंजनाचा तडका! रिलीज होतायत 25 पेक्षा अधिक मूव्ही आणि सीरिज
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement