Bigg Boss 19 : 'माझ्या गर्लफ्रेंड होत्या तेव्हा आईचे बॉयफ्रेंड होते'; हिरोईनच्या मुलाचा शॉकिंग खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kunika Sadanand Relationship with Kumar Sanu : गायक कुमार सानू यांच्या अफेअर्सच्या स्टोरी बॉलिवूडमध्ये तुफान हिट आहेत. बिग बॉस 19मधील एका अभिनेत्रीचं देखील कुमार सानूसोबत अफेअर असल्याचं तिनेच सांगितलं. त्यानंतर आता तिच्या मुलाची रिअँक्शन समोर आली आहे.
advertisement
advertisement
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कुनिकाचा मुलगा अयान म्हणाला की, "मी तिला दिवसभर घरी त्याची गाणी गाताना पाहिले. मी विनोद करत होतो. पण तिला तो एक गायक म्हणून खूप आवडतो. ती अजूनही त्याची गाणी गाते. लोक म्हणतात की हे प्रेम 27 वर्षे चाललं पण प्रत्यक्षात ती म्हणाली की जेव्हा ते घडले तेव्हा ती 27 वर्षांची होती."
advertisement
advertisement
कुनिका सदानंदनने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात तिच्या प्रेमाबद्दल सांगितले. तिने खुलासा केला की, कुमार सानू विवाहित होता आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना तो त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते. आम्ही एकत्र राहत होतो. पण नंतर त्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते. त्याने मला फसवलं तेव्हा मी त्याला सोडून दिलं."
advertisement
कुनिका एका मुलाखतीत म्हणाली होती की, ती कुमार सानूच्या पत्नीसारखी होती आणि त्याला तिचा नवरा मानत होती. कुनिकाने सांगितलं "त्याच्या पत्नीने हॉकी स्टिकने माझी गाडी फोडली. ती माझ्या घराबाहेर येऊन ओरडायची. पण मी तिला समजून घेतलं. तिला तिच्या मुलांसाठी पैसे हवे होते आणि ती चुकीची नव्हती. तिने सांगितले की तिला कुमार सानू परत नकोय."
advertisement
advertisement
तिने पुढे असंही सांगितलं की, त्यावेळी कुमार सानू त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कठीण काळातून जात होता. त्याने हॉटेलच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. अभिनेत्रीसह त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला खिडकीच्या कड्यावरून खाली खेचले. जेव्हा तो त्याच्या वेदनांबद्दल बोलला तेव्हा तिने त्याला मिठी मारली. या घटनेने तिला आणि कुमार सानूला आणखी जवळ आणले.