Maharashtra : पठारांवर अवतरला स्वर्ग! फक्त कासच नाही, महाराष्ट्रात 'या' ठिकाणीही एक्सप्लोर करू शकता 'फ्लॉवर व्हॅली'

Last Updated:
फिरणं कोणाला नाही आवडत? तुम्हालाही फिरणं आवडतच असेल पण काही व्यक्तींना निसर्गाच्या सानिध्यात फिरणं अधिक आवडत. जस की फ्लॉवर व्हॅली.
1/7
फिरणं कोणाला नाही आवडत? तुम्हालाही फिरणं आवडतच असेल पण काही व्यक्तींना निसर्गाच्या सानिध्यात फिरणं अधिक आवडत. जस की फ्लॉवर व्हॅली. हो, आजकाल कास पठारावरची फुलं पाहण्यासाठी अनेक लोक मोठ्या उत्साहाने साताऱ्याला जातात.

advertisement
2/7
पण अनेक लोकांना माहिती नाही की फक्त कास पठारच नाही महाराष्ट्रात असे आणखी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फुलांनी बहरलेलं पठार पाहू शकता. जर तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तुम्हीही या ठिकाणांना भेट देऊ शकता.

3/7
रतनगड - अहमदनगर जिल्ह्यातील रतनगड येथे तुम्ही फुलांनी बहरलेल्या शांत वातावरणाची मज्जा घेऊ शकता. ट्रेकिंगचा अनुभव आणि सुंदर फुलांनी बहरलेला गड विचार करूनच किती सुख वाटत असेल तर एकदा नक्कीच भेट द्या.

4/7
रायरेश्वर - कास पठारा इतकचं सुंदर आणि फुलांनी गजबजलेलं हे पठार. पुण्यातील भोर तालुक्यात असलेलं हे पठार तुम्हीही एक्सप्लोर करू शकता. ऑगस्टच्या शेवटपासून ते ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत या कालावधीत तुम्ही येथे भेट देऊ शकता.

5/7
हरिश्चंद्रगड - कोकणकडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडाची सुंदरता प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी अनुभवावी. ऑफ सीजनमध्येही ही जागा तितकीच सुंदर आहे जितकी काही खास वेळेत असते. पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर ते फेब्रूवारी या कालावधीत तुम्ही या ठिकाणाला भेट देऊन फुलांनी भरलेला पठार पाहू शकता.

6/7
लोणावळा - घाट म्हटलं की आठवतो तो म्हणजे लोणावळा. पावसाळा सुरु झाला नाही की लोणावळ्याला जाण्याची इच्छा प्रत्येकाची असते. पण तुम्हाला माहिती आहे का, इथले फक्त घाट आणि उंच उंच ट्रेकिंग पॉईंट्च पाहण्यासारखे नाहीत. कारवी फुलांची बहरलेली आरास देखील तुम्ही इथे पाहू शकता.

7/7
करपेवाडीचा डोंगर - साताऱ्यातील जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार जसं विविध फुलांनी आकर्षक दिसते अगदी तसाच देखावा करपेवाडीच्या डोंगरावरही अनुभवायला मिळतो. इथे पावसाळ्यात जवळपास 15 हून अधिक प्रकारची रानफुलं एकत्र फुलून निसर्गाचा रंगीत गालिचा विणतात.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement