Maharashtra ATS Bhiwandi : गाझाच्या नावावर जमवत होते निधी, ATS कडून भिवंडीतून तिघांना अटक, समोर आली धक्कादायक बाब...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra ATS : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आणि उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत भिवंडीतून तिघांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आणि उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत भिवंडीतून तिघांना अटक करण्यात आली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात बेचिराख होत असलेल्या पॅलेस्टाइनच्या जनतेच्या नावावर पाच कोटींचा निधी जमवला. पण तो निधी भलत्याच कामासाठी वापरल्याचा संशय यंत्रणांना आहे.
advertisement
महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएसने संयुक्तपणे मुंबईला लागून असलेल्या भिवंडीमध्ये छापा टाकला. छाप्यादरम्यान तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपींकडून गाझामध्ये मृत आणि जखमी झालेल्यांसाठी निधी उभारण्याच्या नावाखाली पैसे गोळा करत होते. हा सगळा निधी ग्रीसमधील एका सूत्रधारापर्यंत पोहचत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या सूत्रधारानेच या तिघांना हा पॅलेस्टीनी जनतेच्या नावावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी जमवण्याचे निर्देश दिले होते, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
एटीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अनेक इंस्टाग्राम पेज, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केले होते. या ठिकाणाहून त्यांनी लोकांना गाझामधील विदारक परिस्थितीचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत मानवतेच्या दृष्टीने मदत करण्याचे आवाहन केले होते. आरोपींनी गाझामधील लोकांसाठी निधी जमवण्यासाठी यूपीआय आयडी आणि स्वत: च्या बँक खात्याचे तपशील दिले होते. या तिघांनी काही दिवसातच कोट्यवधींचा निधी जमा केला. मात्र, पॅलेस्टाईन जनतेच्या नावाखाली जमवलेला निधी हा कोणत्याही स्वयंसेवी संस्थांपर्यंत पोहचला नसल्याची माहिती तपासात समोर आली. या उलट यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचे दिसून आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा निधी वैयक्तिक फायद्यासाठी अथवा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्याची भीती एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
advertisement
राहायला भिवंडीत आणि अकाउंट उत्तर प्रदेशातलं...
भिवंडी येथील तिघांनी केलेले किमान 50 व्यवहार केले. भिवंडीतील या तिन्ही आरोपींनी उत्तर प्रदेशातील बँक अकाउंटवरून व्यवहार केले असल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच महाराष्ट्र एटीएसने त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या ठिकाणाची माहिती होताच, सक्षम न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट मिळवले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापे टाकले. मोहम्मद अयान (22), झैद नोटियार (22) आणि अबू सुफियान (22) अशी झाली आहे. आरोपींना मुंबई न्यायालयात हजर केल्यानंतर, यूपी एटीएसने त्यांना लखनौला नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळवला, जिथे त्यांना सक्षम न्यायालयात हजर केले जाणार आहे.
advertisement
ग्रीसमध्ये फुटले पैशांना पाय...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निधीचा एक मोठा भाग ग्रीसमध्ये पोहचला. त्यानंतर हा पैसा काही युरोपीयन देशांमधील खात्यांमध्ये वळता करून काढण्यात आला. निधीचा स्रोत लपवण्यासाठी, पैसा कुठं गेला याचा तपास होऊ नये यासाठी मनी लाँड्रिंगचा हा पॅटर्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जप्त केलेले मोबाईल फोन आणि डिजिटल रेकॉर्डच्या फॉरेन्सिक तपासणीतून पुढे असे दिसून आले की या तिघांना त्यांच्या ग्रीस-आधारित हँडलरकडून नियमितपणे थेट सूचना मिळत होत्या. त्यांच्यात संवादही साधला जात होता. त्यामुळे अटकेत असलेले आरोपी हे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा हिस्सा असू शकतात.
advertisement
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तिघांच्या मोबाइलमध्ये त्यांनी सुरू केलेले सोशल मीडिया अकाउंट आणि इतर माहिती मिळाली आहे. त्यांना ज्यांनी पैसे पुरवले अशा सगळ्या देणगीदारांची माहिती काढली जात आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करून दहशतवादी कृत्यासाठीचा निधी मिळवण्याचा हा प्रयत्न असू शकतो अशी भीती अधिकाऱ्याने व्यक्त केली. एटीएसकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 10:49 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Maharashtra ATS Bhiwandi : गाझाच्या नावावर जमवत होते निधी, ATS कडून भिवंडीतून तिघांना अटक, समोर आली धक्कादायक बाब...