ट्रम्प यांचा बॉम्ब, IT सेक्टरमध्ये भूकंप, 13000 कोटी बुडाले म्युच्युअल फंडचा बाजार उठला

Last Updated:

डोनाल्ड ट्रम्प यांच्या H1B व्हिसा निर्णयामुळे IT आणि फायनान्स सेक्टरमध्ये मोठा भूकंप, शेअर्स गडगडले, म्युच्युअल फंडचे 13000 कोटी बुडाले, सोन्या चांदीच्या ETF धारकांना फायदा.

News18
News18
डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाबाबत एक मोठी घोषणा केली, त्यानंतर IT फायनान्स सेक्टरमधील कंपन्यांनी H1B व्हिसा असणाऱ्या लोकांना तातडीनं अमेरिकेत बोलवून घेतलं. जे अमेरिकेतून बाहेर जाणार होते त्यांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या होता. H1B व्हिसाबाबतचे निर्णय 21 सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर आज शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप उडाला आहे. शेअर मार्केटमध्ये IT सेक्टर्सचे शेअर्स या भीतीनं कोसळले आहेत.
GSTच्या बुस्टरमुळे इतर सेक्टरचे शेअर्स मात्र वधारले आहेत. दुसरीकडे म्युच्युअल फंड कंपन्यांचे 13 हजार कोटी रुपये बुडाले असून चांगलाच बाजार उठला आहे. या सगळ्यात सोन्या चांदीच्या दरांवर कोणताही परिणाम झाला नाही. ते दर वधारलेलेच आहेत असं दिसत आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या ETF मध्ये पैसे लावलेल्यांची चांदी झाली आहे. ट्रम्प यांनी H 1B व्हिसाची फी 1000 डॉलरवरुन 1 लाख डॉलर केली आहे. त्याचा मोठा फटका आयटी आणि फायनान्स सेक्टरला बसला आहे.
advertisement
भारतातील IT सेक्टरमध्ये मोठा भूकंप आला असून शेअर्सच्या किंमती गडगडल्या आहेत. तर म्युच्युअल फंडचे व्हॅल्युएशन तीन दिवसांमध्ये 13000 कोटी रुपयांनी कमी झालं आहे. इंफोसिस, टीसीएस, एचसीएल, टेक महिंद्रा, Coforge, Persistent Systems, Mphasis, विप्रो, LTIMindtree, Oracle Financial Services, या सारख्या कंपन्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. नव्याने हायरिंग होणाऱ्या तरुणांवर या नव्या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.
advertisement
ब्रोकरेज रिपोर्टच्या मते टॉप 10 आयटी कंपन्यांमध्ये 1.2-4.1 टक्के कर्मचारी H1B व्हिसावर आहेत. शॉर्ट टर्ममध्ये तरी शेअर मार्केट निगेटिव्हमध्ये आहे. मात्र दीर्घकाळासाठी हा परिणाम दिसेलच याची शक्यता कमी आहे. मात्र आयटीचे शेअर्स जे कमी झाले आहेत ते घेण्याची ही संधी देखील आहे. JM Financial च्या मते, आयटी सेक्टरमधील अनिश्चितता संपुष्टात येईल. एकतर स्थिरता राहील किंवा वाढ अथवा कमजोरी येईल मात्र ते त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असेल. ही गोष्ट सकारात्मक वाटते.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
ट्रम्प यांचा बॉम्ब, IT सेक्टरमध्ये भूकंप, 13000 कोटी बुडाले म्युच्युअल फंडचा बाजार उठला
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement