Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई प्रवास कधी होणार सुसाट? प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं वाचवणाऱ्या 'मिसिंग लिंक'बाबत महत्त्वाची अपडेट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारंवार होणाऱ्या महाकोंडीतून प्रवाशांची कायमस्वरूपी सुटका करणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, या मार्गावरून सुसाट धावण्यासाठी प्रवाशांना आणखी किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे
लोणावळा: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारंवार होणाऱ्या महाकोंडीतून प्रवाशांची कायमस्वरूपी सुटका करणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, या मार्गावरून सुसाट धावण्यासाठी प्रवाशांना आणखी किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. एमएसआरडीसीच्या (MSRDC) नियोजनानुसार, मे २०२६ पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
केबल ब्रिजमुळे 'डेडलाईन' लांबली
मिसिंग लिंक प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी १३० मीटर उंचीच्या केबल स्टेड ब्रिजवर स्लॅब टाकण्याचे काम अद्याप सुरू आहे. तांत्रिक अडचणींमुळे या पुलाचे काम उशिरा सुरू झाले, परिणामी डिसेंबर २०२५ ची डेडलाईन आता एप्रिल-मे २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आशिया खंडातील हा सर्वांत उंच दरीवरील पूल असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
काय होणार फायदा?
वेळेची बचत: या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई हे अंतर ६ किमीने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचेल.
बोगद्यांचा थरार: प्रकल्पात १०.५ किमी लांबीचे दोन आशियातील सर्वांत रुंद बोगदे आहेत, ज्यांचे काम पूर्ण झाले आहे.
घाटातील कोंडीला पूर्णविराम: बोरघाटातील तीव्र वळणे आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ६ किमीच्या भागाला हा मार्ग पर्याय ठरेल.
advertisement
कोंडीचे सावट कायम
नुकताच एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटल्याने सलग ३० तास वाहतूक ठप्प झाली होती. अशा परिस्थितीत 'मिसिंग लिंक'ची गरज तीव्रतेने भासत आहे. मात्र, जोपर्यंत हा ६५०० कोटींचा प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना घाटातील अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 10:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई प्रवास कधी होणार सुसाट? प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं वाचवणाऱ्या 'मिसिंग लिंक'बाबत महत्त्वाची अपडेट









