advertisement

Shocking News : आई बाहेर फोनवर बोलत होती अन् आत चिमुकलीसोबत भयंकर... ;कांदिवलीतील घटनेने संताप

Last Updated:

Kandivli News : मुंबईतील एका डेंटिंग क्लिनिकमधील चिमुकलीसोबत झालेला धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. सध्या आरोपी फरार झाला असून पोलिस तपास सुरु आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागात एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दातांच्या उपचारासाठी गेलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दातांच्या डॉक्टरकडून विनयभंग झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित या डॉक्टराविरोद्धात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या ओरडण्याने पितळ उघडे
ही घटना कांदिवली पश्चिमेतील पटेल नगर परिसरातील एका खाजगी क्लिनिक,त घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत दातांच्या उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेली होती. उपचार सुरू असताना मुलीच्या आईला अचानक फोन आला. फोनवर बोलण्यासाठी आई काही वेळासाठी क्लिनिकबाहेर गेली.
याच संधीचा फायदा घेत आरोपी दातांचे डॉक्टर रवी सिंग याने मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने सांगितले की डॉक्टरने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. घाबरलेल्या मुलीने जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला. तिचा आवाज ऐकताच आई तातडीने क्लिनिकमध्ये धावून गेली.
advertisement
यानंतर मुलीने घडलेली संपूर्ण घटना आईला सांगितली. कुटुंबीयांनी क्षणाचाही उशीर न करता जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टर रवी सिंग याच्याविरोधात गुन्हा नोंदवला.
तक्रार दाखल होताच संशयित डॉक्टर फरार
घटनेची माहिती मिळताच आरोपीने आपले क्लिनिक बंद केले आणि तो फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking News : आई बाहेर फोनवर बोलत होती अन् आत चिमुकलीसोबत भयंकर... ;कांदिवलीतील घटनेने संताप
Next Article
advertisement
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement