Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर काळे ढग, सोलापूर ते पुणे झोडपणार, आज 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. पुणे, सोलापूरसह 5 जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अशातच राज्याच्या कमाल तापमानातील वाढ देखील कायम आहे. आज 23 सप्टेंबर रोजी कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात उघडीप राहिली. यावेळी कमाल तापमान 26.7 अंश सेल्सिअस राहिले. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 29 अंशावर राहिल. पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यात अंशत: ढगाळ वातावरण राहून गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगवान वाऱ्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement










