Mahesh Landge On Ajit Pawar : सुन्न करणारी सकाळ...! अजित पवारांच्या निधनानंतर महेश लांगडे भावूक, पोस्ट चर्चेत!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mahesh Landge On Ajit Pawar : प्रशासनावर असलेली पकड आणि मिश्किल, स्पष्ट स्वभाव यामुळे अजित दादा लोकप्रिय होते. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत महेश लांडगे यांनी श्रंद्धाजली अर्पण केली आहे.
Mahesh Landge On Ajit Pawar : डेप्युटी सीएम अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आता राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी अजित पवारांवर जहरी टीका करणारे महेश लांडगे अजितदादांच्या मृत्यूनंतर भावूक झाल्याचं दिसून आले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी वेदना व्यक्त केल्या. महापालिका निवडणूक प्रचारावेळी महेश लांडगे आणि अजित पवार आमने सामने होते. त्यानंतर आता मृत्यूनंतर वैर संपतं याची प्रचिती पहायला मिळाली.
काय म्हणाले महेश लांडगे?
आजची ही सकाळ सुन्न करणारी आहे. राजकारणातल्या मोकळ्या ढाकळ्या नेत्याचं असं जाणं धक्कादायक आहे. प्रशासनावर असलेली पकड आणि मिश्किल, स्पष्ट स्वभाव यामुळे अजित दादा लोकप्रिय होते. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत महेश लांडगे यांनी श्रंद्धाजली अर्पण केली आहे. त्यावेळी भावूक झाल्याचं दिसले.
advertisement
धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता
अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि अतिशय धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादांसारखा असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्यानं एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी पहाटे सहा वाजेपासून तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते, असंही महेश लांडगे म्हणाले.
advertisement
शोकसंदेश :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि अतिशय धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अजितदादांसारखा असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता… pic.twitter.com/o6sVur0ymx
— Mahesh Landge (@maheshklandge) January 28, 2026
advertisement
महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवील
दरम्यान, राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेलं योगदान हा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवील. दादांचं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो, असंही महेश लांडगे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 2:20 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mahesh Landge On Ajit Pawar : सुन्न करणारी सकाळ...! अजित पवारांच्या निधनानंतर महेश लांगडे भावूक, पोस्ट चर्चेत!









