– दादा आर आर आबा आणि वसंत डावखरे यांची तिघांची एक वेगळी मैत्री होती
– दादांच्या जाण्याने माझे व्यक्तीगत नुकसान झालाय
– शिस्तबद्ध राजकीय नेतृत्व कार्यकर्ता कसा जपावा हे अजित दादांनी नेहमी दाखवून दिलं
– त्यांच्या जांण्याने राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे.
उद्या गुरुवारी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वाशितील मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेतील पाचही मार्केट बंद राहणार.
महाराष्ट्र राज्याचे कणखर, कार्यक्षम आणि खमके नेतृत्व लाभलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन अत्यंत दुर्दैवी आणि मनाला खोल वेदना देणारं आहे. अजितदादा आपल्यातून निघून गेले आहेत, ही गोष्ट मन अजूनही स्वीकारायला तयार नाही. माझ्याकडे पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी असताना माननीय अजितदादांशी माझा निकटचा आणि आपुलकीचा संबंध निर्माण झाला. त्या काळात उद्भवलेल्या कोरोना संकटात त्यांनी पक्षीय भिंती बाजूला ठेवून पुणे शहरातील परिस्थिती, उपाययोजना आणि निर्णयप्रक्रियेबाबत सातत्याने संवाद साधला. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी मला विश्वासात घेतलं. हे नातं नंतरच्या काळातही कायम राहिलं. अगदी अलिकडच्या काळात पार पडलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीतही आदरणीय अजितदादांनी सामोपचाराची भूमिका घेतली. नुकत्याच झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान आमच्यात आरोप-प्रत्यारोप झाले असतील, मात्र एकमेकांबद्दल द्वेषाची भावना कधीही नव्हती आणि मनभेदही नव्हते ! अजितदादा पवार यांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी शब्दशः मोठी हानी आहे! आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली !
आज एका अत्यंत दुःखद अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे एनडीएचे (NDA) ज्येष्ठ सहकारी अजित पवार जी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. अजित पवार जी यांनी गेली साडेतीन दशके ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले, ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची, तेव्हा ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन ही NDA कुटुंबासह माझी देखील वैयक्तिक हानी आहे. मी पवार परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. दुःखाच्या या प्रसंगी संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार परिवारासोबत खंबीरपणे उभा आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो. ॐ शांती शांती शांती
महाराष्ट्राच्या राजकारणात दूरदृष्टी, कार्यकुशलता आणि ठाम नेतृत्वाची ओळख असलेले अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू महाराष्ट्रालाच नाही तर देशाला चटका लावणारा आहे.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही.साश्रू नयनांनी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अजित दादांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्या बद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजितदादा अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं. आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं असं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्रासाठी हा कठीण दिवस , अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्या वेळी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असताना अशा काळात त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनिय मनाला चटका लावणारं आहे. माझ्याकरता वैयक्तिक दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याची भावना आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे निघणार आहोत. सकाळपासून मी सर्वांच्या संपर्कात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शाह यांना घडलेल्या घटनेची कल्पना दिली. त्यांनाही या घटनेची माहिती मिळताच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पुढच्या गोष्टी या कुटुंबियांशी चर्चा करून ठरवण्यात येतील. एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर पुढचे सगळे निर्णय त्यांच्या संमतीने घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केली आहे. त्यासोबत तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल. कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचं नुकसान आहे. महाराष्ट्रातील लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते. ती पोकळी भरून न निघणारी आहे.
बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताचा सविस्तर घटनाक्रम समोर येत आहे. पुणे–बारामती परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता अत्यंत कमी होती. बारामतीची एअरस्ट्रीप लहान असून येथे ILS म्हणजेच इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पायलटला पूर्णपणे मॅन्युअल आणि व्हिज्युअल पद्धतीने लँडिंग करावी लागणार होती.
सूत्रांच्या माहितीनुसार विमान थेट रनवेवर न येता मोठा वळसा घेत असल्याचे दिसून आले. यावरून पहिला लँडिंगचा प्रयत्न रद्द करण्यात आल्याचे संकेत मिळतात. दाट धुक्यामुळे रनवे योग्य पद्धतीने align करणे अवघड झाले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला.
याच वेळी पायलटने MAYDAY कॉल दिला. DGCA सूत्रांच्या माहितीनुसार हा टेबल-टॉप रनवे असून लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले. सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा ताबा सुटला आणि रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
धडकेनंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर सलग छोटे स्फोट होत गेले. विमानाला भीषण आग लागल्यामुळे तात्काळ बचावकार्य करणे शक्य झाले नाही. सध्या या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून, अपघाताचे नेमके कारण DGCA च्या अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो.
माझ्यासारख्याला वडील नाही याची कधीच जाणीव नाही होऊ दिली- धनंजय मुंडे
कार्यकर्त्यांचा संग्रह असलेला नेता गमावला..
महाराष्ट्राच्या इतिहासातील आजचा दिवस काळा दिवस..
प्रशासनावर असलेली पकड हे दादांचे वेगळेपण..
आज दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झालाय…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहली श्रद्धांजली
अतिशय मनाला चटका लावणारी आजची दुर्दैवी घटना दादांच्या जाण्याने झालीय. कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अतिशय परखड आणि स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली पकड संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होते. रोखठोक बोलणारे असले तरी अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी घेतला आहे. मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होते तेव्हा लाडकी बहीण योजना इतर योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी आहे, आर्थिक तरतूद उत्कृष्टपणे त्यावेळी केली होती याचा अनुभव मला आहे. एकदा करायचं ठरवलं की ते करायचे, करतो बघतो पाहातो असं त्यांचं कधीही नसायचं, आम्ही टीम म्हणून काम केलं. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या आहेत. अजित दादा पहाटे लवकर काम करायचे. अतिशय महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला. खर म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमात आमची भेट झाली. सरन्यायाधीश मुंबईत आले होते ते येण्यापूर्वी आमची भेट झाली. त्यावेळी आमच्या चर्चा गप्पा गोष्टी झाल्या. आज जेव्हा मला बातमी कळली तेव्हा परवाच्या भेटीची आठवण पटकन डोळ्यासमोर आली. माझ्यापेक्षा ते राजकारणातील अनुभवती नेते, राजकारण, वयाने सगळ्याच बाबतीत मोठे होते. राजकारणातील अनेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्याचा फायदा मंत्रिमंडळात व्हायचा. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन येणारं नुकसान झालं आहे. माझ्या पेक्षा वयानं मोठे असल्यामुळे जे काही आमची जवळीक निर्माण झाली होती राजकारणातले आम्ही एक टीम म्हणून काम करत असलो तरीसुद्धा एक मोठा भाऊ म्हणून माझ्यासाठी होते. मोठा भाऊ हरपल्याची भावना त्याचं दु:ख माझ्या मनात आहे. मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. उपमुख्यमंत्री शिंदेंचे शब्द बोलताना अडखळले, त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी आवंढा गिळला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जळगाव संजय पवार याचे अश्रू अनावर
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून टेक ऑफ केलं होतं. हे विमान ४० मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचलं.



