advertisement

'दादांनी संधी दिली म्हणून मी...' अजित पवारांच्या निधनानंतर घनश्याम दरोडे भावुक, VIDEO

Last Updated:

अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. घनश्याम दरोडेने व्हिडीओ शेअर करत दादांना श्रद्धांजली वाहिली.

News18
News18
आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बारामतीमध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी चालले असताना हा अपघात झाला. अजित दादांच्या निधनाच्या माहितीनंतर संपूर्ण महाराष्ट्र दु:खात बुडाला आहे. पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सामाजिक, राजकीय, मनोरंजन विश्वातूनही अनेकांनी दादांना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्रात छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा घनश्याम दरोडेनं अजित दादांना व्हिडीओ शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. मला दादांनीच छोटा पुढारी बनवलं असं सांगत घनश्याम भावुक झाला.
व्हिडीओ शेअर करत धनश्याम म्हणाला, "मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की, आज तुम्ही मला छोटा पुढारी म्हणून सगळीकडे ओळखलं जातं. ती खरी ओळख मला कोणी दिली असेल तर ते माझ्या तालुक्याचे माजी आमदार आणि आदरणीय अजित दादा पवार. त्यांनी मला पहिल्यांदा त्यांच्या मोठ्या व्यासपिठावर बोलण्याची संधी दिली. त्यावेळेस मला बोलताही येत नव्हतं. 2014 साली मी पहिलं भाषण केलं. आज मला ओळखलं जातंय पण त्यांच्यामुळे मला ओळखलं जातंय."
advertisement
"आज अजित दादा पवारांचं सकाळी विमान दुर्घटनेत निधन झालं.अजित दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. सगळ्यांना माहितीये अजित दादांची काम करण्याची ऊर्जा, एक ख्याती आणि चांगल्या चांगल्या घाम पोडणारे, दादा म्हणजे शब्दाचा वादा."
advertisement
घनश्याम पुढे म्हणाला, "मी महाराष्ट्राला एकच सांगेन की, माणूस जरी गेला तरी विचारांनी कायम आचरणात असतो. दादा तुम्ही गेलात पण संपूर्ण महाराष्ट्राला पोरकं करून गेलात. आमच्या मनात पोकळी निर्माण केलीत. दादा तुम्ही गेलात नव्हे तर तुमचे विचार रुजवून गेलात. तुम्हाला घनश्याम दरोडे आणि दरडो परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ईश्वर चरणी एकच प्रार्थना करतो पवार कुटुंब, महाराष्ट्र, तरुण कुटुंब, महाराष्ट्रातील जनतेला लवकरच या दु:खाची सावरण्याची संधी भेटो, दादा तुम्ही कायम आमच्या आचरणात राहाल."
advertisement
सांगायचं झाल्यास, छोटा पुढारीच्या भाषणांवर अजित पवार अनेकदा खळखळून हसताना दिसले आहेत. छोटा पुढारीला पुढे जाण्यासाठी त्यांनी लाखमोलाची मदत केली होती.
अजित पवार यांच्या विमान अपघतात त्यांच्यासह आणखी 6 जणांचाही मृत्यू झाला आहे. विमानाची पायलट शांभवी हिचाही मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'दादांनी संधी दिली म्हणून मी...' अजित पवारांच्या निधनानंतर घनश्याम दरोडे भावुक, VIDEO
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement