नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी काय आहेत सोन्याचे दर? GST चा इफेक्ट सोन्यावर होणार का?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नवरात्र उत्सवात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले. IBJA नुसार २४ कॅरेट सोनं १,१४,४२२ प्रति तोळा. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीमुळे वाढ कायम.
देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीनिमित्ताने पुन्हा एकदा सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. सध्या सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थितीत असून, लवकरच ते आणखी वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आणि भविष्यात आणखी कपातीचे संकेत दिले.
या सगळ्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याच्या दरात वाढ होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. या आठवड्यात जाहीर होणाऱ्या अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीकडे आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या भाषणांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे.
सध्याचे सोन्याचे भाव
इंडियन बुलियन असोसिएशन (IBJA) नुसार, आजचे (२२ सप्टेंबर २०२५) सोन्याचे भाव
24 कॅरेट सोन्याचे दर 1,14,422 प्रति तोळा
advertisement
23 कॅरेट सोन्याचे दर 109645 प्रति तोळा
22 कॅरेट सोन्याचे दर 104891 प्रति तोळा
20 कॅरेट सोन्याचे दर 95344 प्रति तोळा
18 कॅरेट सोन्याचे दर 85810 प्रति तोळा
14 कॅरेट सोन्याचे दर 66741 प्रति तोळा
हे दर देशातील प्रमुख शहरांसाठी (मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता) लागू आहेत. मात्र, प्रत्येक शहरातील आणि ज्वेलर्सच्या दुकानात दरांमध्ये थोडा फरक असू शकतो. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वाढीमागे अनेक जागतिक घडामोडी कारणीभूत आहेत असा तज्ज्ञांचा दावा आहे. सोन्यावरील जीएसटी दर बदललेले नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे, किंमतीवर त्याचा कोणताही परिणाम दिसून येणार नाही.
advertisement
जगभरातील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानत आहेत. केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी सुरू केली आहे. कमी व्याजदरांच्या वातावरणामुळे सोन्यासारख्या गुंतवणुकीला नेहमीच फायदा होतो, कारण त्यात कोणताही परतावा (yield) मिळत नसला तरी ते सुरक्षित मानले जाते. या आठवड्यात फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्यासह अनेक अधिकारी बोलणार आहेत. त्यांच्या भाषणांवरून भविष्यातील आर्थिक धोरणांचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. बाजार ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये पुन्हा दोन वेळा व्याजदर कपातीची शक्यता गृहीत धरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 10:14 AM IST
मराठी बातम्या/मनी/
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी काय आहेत सोन्याचे दर? GST चा इफेक्ट सोन्यावर होणार का?