TRENDING:

Recipe Video : रोजची चपाती-भाकरी खाऊन कंटाळालात; गव्हाच्या पिठात कांदा टाकून बनवा हा खमंग पदार्थ

Last Updated:

Wheat floor Recipe Video : आम्ही तुमच्यासाठी गव्हाच्या पिठापासून आता भन्नाट अशी रेसपी आणली आहे. गव्हाच्या पिठात कांदा टाकून असा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गव्हाच्या पिठापासून तुम्ही काय बनवता तर चपाती. चपाती खाऊन खाऊन कंटाळा आला की भाकरी. पण आता चपाती आणि भाकरी दोन्ही कंटाळाा आला तर... आम्ही तुमच्यासाठी गव्हाच्या पिठापासून आता भन्नाट अशी रेसपी आणली आहे. गव्हाच्या पिठात कांदा टाकून असा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील.
News18
News18
advertisement

एक वाटी गव्हाचं पीठ घ्या. त्यात थोडंसं मीठ. मीठ चालत नसेल तर घालत नसलं तरी चालेल. चपातीसाठी पीठ मळताना मऊ मळतो, हे पीठ घट्ट मळायचं. म्हणजे पदार्थ खुसखुशीत बनतो. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचंय. थोडं तेल घालून मळून घ्या.

आता गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात दोन चमचे तेल, एक चमचा जिरं, जिरं खरपूस भाजलं खमंग सुगंध आला ही हिंग घाला. दोन कांदे उभे पातळ चिरून घ्या. त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्या. तेलात भाजून घ्या. 50 टक्के शिजवून घ्या. हलकासा पारदर्शक झाला की त्यात मसाले टाका. पाव चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धने-जिरपूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा आमचूर पावडर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा लिंबू रस टाकू शकता.

advertisement

लग्नानंतर पहिल्यांदाच जेवण, सासूने भाकरी सांगितली, पण येत नाही? हा VIDEO पाहा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होईल

एक बारीक चिरलेली हिरवी मिरची. लहान मुलांना देणार असाल तर तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ओवा हातावर चोळून टाका. आलं किसून घाला. तुम्ही मिरची आणि आलं ठेचून किंवा वाटूनही घालू शकता. बडीशेफ आणि धने भाजून त्याची जाडसर पावडर करून ती एक चमचा घाला. चवीनुसार मीठ. आता सगळं नीट एक-दोन मिनिटं मिक्स करून घ्या. म्हणजे कांद्याला मसाले चांगले लागतील. आता  गॅस फ्लेम स्लो करून घ्या.

advertisement

गॅस फ्लेम लो टू मीडियम जास्त फास्ट करू नका. यात बेसन टाका म्हणजे कांद्यातील ओलावा शोषून घेईल. हे मिश्रण परतून कोरडं करून घ्या. आता गॅस बंद करा आणि कस्तुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. मिश्रण थंड करून घ्या.

आता मळून ठेवलेलं पीठ पुन्हा मळून घ्या. त्याचे दोन मोठे गोळे करून घ्या. त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून जाड पोळी लाटून घ्या. यावर कांद्याचं सारण पसरवून घ्या. दुसरी पोळी यावर ठेवा आणि बाजूच्या कडा बोटांनी दाबून बंद करून घ्या. आता पिझ्झा कटर किंवा सुरीने सुरळीच्या वळ्या कापतो तशा कापून घ्या. कोपऱ्यातील एका भागाचा रोल करून घ्या, तो मधल्या पट्टीवर ठेवून त्याचाही रोल करून घ्या. पुढील दोन पट्ट्यांचेही असेच रोल करायचे आहे.

advertisement

Recipe Video : काय नुसतं फदफदं आणि वडी; आता बटाटा घालून बनवा अळूची नवीन रेसिपी

बेसन टाकल्याने स्टफींग कोरडं आहे बिलकुल ओलं लागत नाही. यामुळे खुसखुशीतपणाही येतो. आता हा रोल दोन बाजूने चपटा करून गव्हाचं कोरडं पीठ लावून पोळपाटावर ठेवा. थोडं दाबून त्यावर कांद्याच्या बिया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घ्या. आता ही पोळी जाड लाटून घ्या.

advertisement

गॅसवर तवा गरम करायला ठेवा. लो टू मीडियम ठेवा. फास्ट ठेवू नका नाहीतर पराठा कच्चा राहिल. तव्यात तूप टाकून टाका आणि त्यावर पराठा टाका. पराठ्याच्या कडेनेही तूप सोडा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. जाळीवर काढा म्हणजे वाफ निघून जाईल तो ओला होणार नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

तुम्ही हे स्टफिंग बनवून आयत्यावेळी बनवू शकता. पराठा दही, लोणचं, टोमॅटोची चटणीसोबतही खाऊ शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Recipe Video : रोजची चपाती-भाकरी खाऊन कंटाळालात; गव्हाच्या पिठात कांदा टाकून बनवा हा खमंग पदार्थ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल