लग्नानंतर पहिल्यांदाच जेवण, सासूने भाकरी सांगितली, पण येत नाही? हा VIDEO पाहा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Make Bhakari : परफेक्ट भाकरी येण्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते असं म्हणतात. पण पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट भाकरी कशी बनवायची हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते. त्यानंतर तिला सासरच्या घरी पहिल्यांदाच जेवण बनवायला लागतं. तेव्हा तिला खूप मोठं टेन्शन असतं. कारण माहेरी आईच्या हातचं आयतं खाणाऱ्या मुलीला सासरी तिच्या हाताने इतरांसाठी जेवण बनवायला लागतं. कधीच काही केलेलं नसतं. त्यामुळे करायचं कसं असा प्रश्न असतो. त्यातही जर भाकरी करायला सांगितली मग झालंच. पण अशाच मुलींसाठी आम्ही भाकरीची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत.
भाकरी बनवणं म्हणजे सगळ्यात कठीण पदार्थ बनवणं असं वाटतं. भाकरीचं पीठ मळणं, ती थापणं आणि तव्यावर टाकून पाणी लावून शेकवणं.... प्रत्येक स्टेपला कस लागतो. भाकरी बनवताना बऱ्याच समस्या येतात. त्यामुळे परफेक्ट भाकरी येण्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते असं म्हणतात. पण पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट भाकरी कशी बनवायची हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
advertisement
पीठ कसं मळायचं?
पीठ मळण्यासाठी जे ताट घेणार आहे, त्याखाली ओला कपडा ठेवा जेणेकरून ताट हलणार नाही. आता पीठात थोडंथोडं पाणी टाकून मळून घ्या. एक वाटी पीठ आणि पाऊण वाटी पीठ असं प्रमाण परफेक्ट आहे. पीठ नीट मळा, नाहीतर भाकरीला भेगा पडू शकतात किंवा भाकरी नीट थापली जात नाही. पीठ बारीक दळून आणायचं.
advertisement
भाकरी कशी थापायची?
सुरुवातीला भाकरी लहानच करा म्हणजे ती उचलून तव्यावर टाकणंही सोपं होईल. पिठाचा गोळा हातात घेऊन थोडा चपटा करून घ्या. ताट ओलं नसावं म्हणजे पीठ चिकटणार नाही. ताटात थोडं कोरडं पीठ पसरवून घ्या आणि कमी दाब देऊन हाताच्या तळव्याने नीट थापून घ्या. जास्त दाब देऊ नका नाहीतर पीठ ताटाला चिकटेल. ताटात पीठ मळून तुम्ही भाकरी पोळपाटावरही थापू शकता.
advertisement
भातरी कशी शेकवायची?
गॅस मोठा ठेवा, तवा नीट गरम करून घ्या. तवा नीट गरम झाला नाही तर भाकरीचे पापुद्रे निघतात, ती नीट फुगत नाही, कडक होते. पाण्याचा शिबका मारून तवा गरम झाला का पाहा. भाकरी थापली तो भाग तव्यावर आणि पिठाचा भाग अशी भाकरी तव्यावर टाका. पाणी एकदम जास्त आणि एकदम कमीही नाही, भाकरी टाकल्यानंतर काही सेकंदात थोडं थोडं पाणी लावा.भाकरी टाकल्या टाकल्या लावू नका, भाकरीला चिरा पडतील. पाणी लावताना भाकरी पोळू देऊ नका, नाहीतर भाकरीचं पाणी लगेच सुकते.
advertisement
पाणी लावल्यानंतर भाकरीवरील पाणी थोडं सुकलं की ती लगेच पलटा. आता मधला भाग फुगला आणि गॅस हाय फ्लेमवर असेल तर भाकरी कडवट लागेल. त्यामुळे गॅस कमी करा आणि फुगलेला भाग खाली बसला की गॅस फास्ट करा.
advertisement
भाकरी जिथं कच्ची दिसेल तिथं हाताने शेकवून घ्या. आता भाकरी परतून घ्या आणि उलथण्याने दाब द्या म्हणजे ती फुगेल.
भाकरी नरम राहण्यासाठी काय करायचं?
view commentsभाकरी नरम राहण्यासाठी थंड झाल्यावर टोपलीत सुती कापड टाकून त्यात गुंडाळून ठेवा किंवा चपातीच्या भांड्यात बंद करून ठेवा.
Location :
Delhi
First Published :
November 05, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्नानंतर पहिल्यांदाच जेवण, सासूने भाकरी सांगितली, पण येत नाही? हा VIDEO पाहा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होईल


