TRENDING:

युद्ध, महामारी किंवा संकट काळात का वाढते कंडोमची विक्री? कोविडमध्ये भारतात आणि आता ईरान-इस्रायल युद्धातही वाढली मागणी

Last Updated:

अलीकडेच ईरान-इस्रायल संघर्ष 12 दिवस चालू असताना तेहरानच्या ऑनलाइन बाजारात एक वेगळाच ट्रेंड दिसला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जेव्हा युद्ध, महामारी किंवा मोठं संकट येतं, तेव्हा लोकांच्या जीवनशैलीत मोठे बदल दिसून येतात. भीती, असुरक्षितता आणि "उद्या काय होईल?" या अनिश्चिततेत माणूस सर्वात आधी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेबद्दल विचार करतो. त्यामुळे लोक अन्नधान्य, औषधं, सॅनिटरी वस्तू, अगदी वैयक्तिक वापराच्या वस्तूही जास्त प्रमाणात खरेदी करून ठेवतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अलीकडेच ईरान-इस्रायल संघर्ष 12 दिवस चालू असताना तेहरानच्या ऑनलाइन बाजारात एक वेगळाच ट्रेंड दिसला. लोकांनी शस्त्रं किंवा युद्धसामग्रीपेक्षा आरोग्याशी संबंधित वस्तूंवर भर दिला. ईरानमधील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म डिजीकालाच्या अहवालानुसार, या काळात कॉन्डोमच्या खरेदीत तब्बल 26 टक्क्यांनी वाढ झाली.

या ट्रेंडमुळे असा प्रश्न उपस्थीत होतो की अशा युद्धाच्या काळात लोक कॉन्डमच का जमा करतात? आश्चर्य म्हणजे भारतात कोरोना सुरु होता. त्या काळात देखील सर्वात जास्त कॉन्डमची विक्री झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. भारतच नव्हे तर इतरही देशांमध्ये ही नोंद केली गेली ज्यामध्ये अमेरीका देखील आहे.

advertisement

ईरान-इस्रायलमधल्या या संघर्षाच्या काळात देखील असंच काहीसं चित्र आहे. लोकांनी फक्त कॉन्डोमच खरेदी केले असे नव्हे, तर सॅनिटरी पॅड्स, सॅनिटायझर, ब्लड शुगर मॉनिटर, मेडिकल बँडेज, अडल्ट डायपर, अंडरपॅड्स अशा अनेक वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या. मात्र सगळ्यात जास्त लक्षवेधी बाब म्हणजे कॉन्डोमच्या विक्रीत आलेला सातत्यपूर्ण वाढ.

हा प्रकार केवळ ईरानपुरता मर्यादित नाही. जगभरात संकट किंवा युद्धकाळात असाच पॅटर्न दिसला आहे.

advertisement

उत्तर कोरिया, 2006 : अण्वस्त्र चाचणीनंतर रोज विकल्या जाणाऱ्या कॉन्डोमची संख्या 1508 वरून 1930 इतकी झाली.

रशिया, 2022 : युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर एका फार्मसी चेनमध्ये विक्री 26% वाढली, तर एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तब्बल 170% वाढ नोंदली गेली.

अमेरिका, 2020 कोरोना महामारीच्या सुरुवातीला कॉन्डोम विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली.

तज्ञांच्या मते, अशा काळात वाढलेली खरेदी म्हणजे वापरही वाढतो असं नसतं. पण लोकांना वाटतं की "उद्या कदाचित हे उपलब्ध नसेल", म्हणून ते वस्तू जास्त प्रमाणात साठवून ठेवतात. युद्ध, महामारी किंवा इतर संकटाच्या काळात लोक जास्तीत जास्त वस्तू खरेदी करून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा मानसशास्त्रीय प्रयत्न करतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
युद्ध, महामारी किंवा संकट काळात का वाढते कंडोमची विक्री? कोविडमध्ये भारतात आणि आता ईरान-इस्रायल युद्धातही वाढली मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल