पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की तापामुळे हाडं का इतकी दुखतात किंवा हाडांवरच त्याचा परिणाम का होतो? चला आपण सविस्तर जाणून घेऊ.
त्या आधी आपण डेंग्यू म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेऊ.
डेंग्यू काय आहे?
डेंग्यू एक व्हायरल इन्फेक्शन आहे जो एडीज एजिप्टी मच्छर चावल्याने पसरतो. विशेषतः पावसाळ्याच्या काळात हा मच्छर अधिक सक्रिय होतो. डेंग्यूचे सामान्य लक्षण म्हणजे ताप, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ, अंग आणि सांधेदुखी इत्यादी. पण या आजारात होणारं अंग दुखणं सामान्य नसतं, ते इतकं तीव्र असतं की रुग्णाला वाटतं त्याच्या शरीरातलं काहीतरी तुटतंय.
advertisement
शरीर दुखण्यामागचं कारण काय?
डेंग्यू विषाणू शरीरात गेल्यावर आपल्या इम्यून सिस्टमला सतर्क करतो. ही लढाई सुरू होताच शरीरात सूज निर्माण करणारे साइटोकाइन्स (Cytokines) नावाचे केमिकल्स तयार होतात. हे केमिकल्स हाडं, सांधे आणि स्नायूंमध्ये जाऊन सूज निर्माण करतात, त्यामुळे प्रचंड वेदना जाणवतात.
प्लेटलेट्स घटल्यामुळे काय होतं?
डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्स वेगाने कमी होतात. यामुळे मांसपेशींमध्ये थकवा, कमकुवतपणा येतो. त्यामुळे चालणं, उठणं, बसणंही त्रासदायक होतं. याचं एक परिणाम म्हणजे सतत थकवा आणि हालचालींवर मर्यादा.
डेंग्यूमधील वेदना कमी करण्यासाठी काय करावं?
भरपूर विश्रांती घ्या : शरीर बरे होण्यासाठी आराम अत्यंत आवश्यक आहे.
हायड्रेशन ठेवा : पाणी, नारळ पाणी, सूप यांचा पुरेशा प्रमाणात वापर करा.
फक्त पॅरासिटामॉल घ्या : डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. इतर पेनकिलर्स प्लेटलेट्स अजून कमी करू शकतात.
गरम पाण्याचे शेक : सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदनांवर आराम मिळतो.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)