घरी शिजवलेलं अन्न आणि बाहेर शिजवलेलं अन्न यात खूप फरक आहे, आणि म्हणूनच बाहेरचं अन्न खाणं पौष्टिक असतंच असं नाही. बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर जास्त तहान का लागते ते समजावून घेऊ.
Cancer : शरीरात नकळतपणे होतो कर्करोगाचा शिरकाव, वेळीच व्हा सावध
तुम्ही घरी चार पोळ्या आणि भाज्या खाल्ल्या तरी बाहेर दोन पोळ्या खाल्ल्यानंतर तुम्हाला जितकी तहान लागते तितकी तहान घरी लागत नाही. सोडियम हे यामागील मुख्य कारण आहे.
advertisement
जास्त तेलकट आणि जड अन्न हे देखील प्रमुख कारण आहे. घरी शिजवलेल्या जेवणाच्या तुलनेत, बाहेरच्या जेवणात सोडियम आणि तेल जास्त असतं. चव वाढवण्यासाठी प्रक्रिया केलेले पीठ आणि मीठ बहुतेकदा वापरलं जातं. शरीरातील जास्त मीठामुळे द्रवपदार्थाचं संतुलन बिघडतं आणि हे दुरुस्त करण्यासाठी शरीर जास्त पाणी वापरतं. पेशी मेंदूला अधिक पाण्याची आवश्यकता असल्याचे संकेत देतात. यामुळे वारंवार तहान लागते.
Skin Care : घरात तयार होऊ शकेल असा झटपट फेसपॅक, वाचा खास स्किन केअर टिप्स
दुसरं कारण म्हणजे जास्त प्रमाणात अन्न खाणं. जड अन्न पचवण्यासाठी शरीराला साधं अन्न पचवण्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात. तसंच, तेलकट किंवा प्रथिनयुक्त अन्न खाल्लं असेल, तर या प्रक्रियेत पोटाला प्रथिनांचं विघटन करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते आणि यासाठी शरीराला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
घरी असतानाही, जेव्हा आपण तेलात तळलेली पुरी किंवा भजी खातो, तेव्हा आपल्याला दिवसभर तहान लागते आणि पोट भरल्यासारखं वाटतं. तहान भागवण्यासाठी फक्त पाणी पुरेसं नाही. सतत तहान लागल्यावर फक्त साधं पाणी पुरेसं नाही. तहान भागवण्यासाठी ताक खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे तहान तर भागतेच पण पचनालाही मदत होते.
