TRENDING:

‘सिक्रेट सांता’ ऑफिसमध्ये का खेळला जातो? कंपनीच्या HR ने खरं कारण सांगितलं

Last Updated:

गेल्या काही वर्षांपासून धार्मिक ठिकाणांबरोबरच अनेक कार्यालयांमध्येही ख्रिसमस सण साजरा करण्याची परंपरा वाढताना दिसत आहे. ख्रिसमससह विविध सण आजकाल ऑफिसमध्ये सामूहिक पद्धतीने साजरे केले जात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिनिधी- पूजा सत्यवान पाटील, पुणे
advertisement

पुणे: सध्या सगळीकडे ख्रिसमस सणाची जोरदार तयारी सुरू आहे. बाजारपेठामध्ये देखील खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांसाठी हा महत्त्वाचा सण मानला जातो.

गेल्या काही वर्षांपासून धार्मिक ठिकाणांबरोबरच अनेक कार्यालयांमध्येही ख्रिसमस सण साजरा करण्याची परंपरा वाढताना दिसत आहे. ख्रिसमससह विविध सण आजकाल ऑफिसमध्ये सामूहिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. ऑफिसमध्ये सण साजरे करण्यामागचं नेमकं कारण काय? याविषयी TeamLease Digital कंपनीचे HR आदित्य वाकोडकर यांनी 'लोकल 18' ला माहिती दिली आहे.

advertisement

आदित्य वाकोडकर यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून ऑफिसमध्ये प्रत्येक धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ख्रिसमस साजरा करण्यामागेही अनेक कारणे आहेत. ख्रिसमससोबत दिवाळी, मकर संक्रांत, ईद, गणेशोत्सव यांसारखे इतर सणही ऑफिसमध्ये साजरे केले जातात. ऑफिसमध्ये वेगवेगळ्या टीममध्ये काम करणारे अनेक कर्मचारी असतात. रोजच्या कामाच्या व्यापात अनेकदा एकमेकांशी संवाद होत नाही किंवा ओळख निर्माण होत नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
62 वर्षांच्या तरुणाचा आकुर्डी ते तिरुपती1136 किमी सायकल प्रवास, दिला खास संदेश
सर्व पहा

मात्र, अशा सणांच्या निमित्ताने सर्व कर्मचारी एकत्र येतात, संवाद वाढतो आणि आपुलकीची भावना निर्माण होते. या सणांमुळे टीममध्ये जास्त एकजूट तयार होते आणि ऑफिसचे वातावरण अधिक सकारात्मक राहते. कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण काहीसा कमी होण्यास मदत होते. सणांचा आनंद लुटल्यानंतर ते पुन्हा जोमाने कामाला लागतात आणि याचाच थेट फायदा कंपनीला होतो. ऑफिसमध्ये विविध धर्मांचे कर्मचारी असल्यामुळे एकमेकांचे सण, परंपरा आणि संस्कृतीबद्दल माहिती मिळते. शिवाय, प्रत्येक सण काही ना काही शिकवण देतो, त्यामुळे ख्रिसमस असेल किंवा इतर सण ऑफिसमध्ये उत्साहात साजरे केले जातात, असे आदित्य वाकोडकर यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
‘सिक्रेट सांता’ ऑफिसमध्ये का खेळला जातो? कंपनीच्या HR ने खरं कारण सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल