स्त्रियांच्या शरीरात तयार होणारे हॉर्मोन्स अनेक गोष्टी प्रकारे आरोग्याचं नियमन करतात. न्युरोएंडोक्राइन, स्केलेटल, अॅडिपोज आणि कार्डिओव्हॅस्क्युलर प्रक्रियेवर स्त्रियांच्या शरीरातल्या इस्ट्रोजेन हॉर्मोनचा प्रभाव पडत असतो. तारुण्यापासून ते मेनोपॉजपर्यंतच्या काळात स्त्रियांच्या शरीरात तयार होणाऱ्या इस्ट्रोजेन या हॉर्मोनमुळे स्त्रियांचं आरोग्य सांभाळलं जातं. मनोपॉजनंतर हे हॉर्मोन तयार होणं थांबतं व स्त्रियांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. इस्ट्रोजेन हे स्त्रियांच्या आरोग्याचं रक्षाकवच म्हणून काम करतं. त्यामुळेच उतारवयात स्त्रियांना काही व्याधी जडण्याची शक्यता असते.
advertisement
इस्ट्रोजेनमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. कारण यामुळे लिपिड्सचं ऑक्सिडेशन होण्यास मदत होते. रजोनिवृत्तीप्रमाणेच जेव्हा मासिक पाळी अनियमित असते तेव्हाही इस्ट्रोजेनची सुरक्षा मिळू शकत नाही. इस्ट्रोजेन उपलब्ध नसल्यामुळे चरबी रक्तवाहिन्यांमध्ये जाते. याला अॅथेलोस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं. यामुळे रक्तवाहिन्यांमधला पोकळ भाग कमी होतो. रजोनिवृत्तीमध्ये कोरोनरी आर्टरी स्क्लेरॉसिस होण्याची शक्यता सातपट जास्त असते.
रक्तवाहिन्या व्यवस्थित राखण्याचं काम इस्ट्रोजेन हे हॉर्मोन करत असतं. यामुळे वाहिन्यांचं काम सुरळीत सुरू राहतं. इस्ट्रोजेन हॉर्मोनमुळे विविध प्रकारे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
ज्यावेळी हे इस्ट्रोजेन कमी होतं, तेव्हा लठ्ठपणा वाढू लागतो. अँटिइन्फ्लमेटरी आणि अँटिऑक्सिडंट्स यांच्या घटत्या संतुलनाशी याचा संबंध असतो. यामुळे हृदय व हदृयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
रजोनिवृत्तीच्या आधी स्त्रियांची ग्लुकोजचं पचन करण्याची क्षमता जास्त असते. रजोनिवृत्तीमध्ये स्त्रियांची ही क्षमता हळूहळू कमी होते. यामुळे इस्ट्रोजेनचं अभिसरण कमी होतं व डायबेटिस होण्याचा धोका वाढतो. डायबेटिस, रक्तदाब, अनियमित कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा हे सर्व मेटॅबॉलिक सिंड्रोमचा परिणाम असतात. म्हणजेच शरीरातली चयापचयाची प्रक्रिया बिघडली, की हे सारं उद्भवतं. यामुळे स्त्रियांना हृदय व रक्तवाहिन्यांचे आजारच नाही, तर स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सरचाही धोका असतो.
याचाच अर्थ स्त्रियांच्या एकंदर आरोग्यात इस्ट्रोजेन हॉर्मोनचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे स्त्रियांनी रजोनिवृत्तीपूर्वी व त्या नंतरही योग्य जीवनशैली अंगिकारली पाहिजे. वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे. यामुळे आजारांना निमंत्रण मिळणार नाही.
