योगामुळे तुमच्या हृदयावर जास्त दबाव येऊन ते तुमच्या आयुष्यासाठी धोकादायक देखील बनू शकतं. जर तुमचं हृदयाचं आरोग्य चांगलं नसेल तर योगा करताना काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. दिल्लीतील प्राइमस हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजीचे प्रमुख डॉ. विकास चोप्रा म्हणाले, योगा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, परंतु ते योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे.
advertisement
जर तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असाल म्हणजेच जर तुम्ही हार्ट पेशंट असाल तर योगा करताना कार्डिओलॉजीचे प्रमुख डॉ. विकास चोप्रा यांनी सांगितलेली पद्धत लक्षात ठेवा.
डॉ. चोप्रा म्हणाले की, योगासन रक्तदाब आणि हृदय गती नियंत्रित करण्यास मदत करतं. ते हृदयाला बळकटी देतं आणि भविष्यात हृदयरोगाचा धोका देखील कमी करते. त्यामुळे ज्यांना हृदयाची कोणतीही गंभीर समस्या नाही त्यांनी निश्चितच योगा आणि आसने करावीत.
पण जर एखाद्या व्यक्तीला आधीच हृदयाची समस्या असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय योगा करू नये. योग्य मार्गदर्शनाशिवाय योगा केल्याने समस्या आणखी वाढू शकते. ज्या रुग्णांना अलीकडेच हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी कठीण योगासन करणं टाळावं. अशा लोकांनी फक्त श्वासोच्छवासाच्या व्यायामावर लक्ष केंद्रीत करावं जेणेकरून हृदयाचे ठोके वाढणार नाहीत आणि हृदयावर जास्त दबाव येणार नाही .